Ujjwala Yojana esakal
देश

Ujjwala Yojana: मोठी बातमी! 'उज्वला' योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपयांचे अनुदान मिळणार

Ujjwala Yojana Update 2025: १२ हजार कोटी रुपयांच्या वाटपाला मंत्रिमंडळाची मान्यता

Mayur Ratnaparkhe

Ujjwala Yojana Subsidy Announced : प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत १२ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे १०.३३ कोटी कुटुंबांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.

या वर्षी १ ऑगस्टपर्यंत देशभरात सुमारे १०.३३ कोटी PMUY कनेक्शन देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजना ही मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणे होता.  हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारत आपल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या गरजांपैकी सुमारे ६० टक्के आयात करतो, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून ही सबसिडी महत्त्वाची ठरते.

अधिकृत निवेदनानुसार, "केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थ्यांना दरवर्षी ९ गॅस सिलिंडरवर ३०० रुपयांची लक्षित सबसिडी देण्यास मान्यता दिली आहे. यावर एकूण १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे."

प्रधानमंत्री उज्वला योजना मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातील गरीब कुटुंबातील महिलांना कोणतेही सुरक्षा पैसे न भरता एलपीजी कनेक्शन देणे हे त्याचे उद्दिष्ट होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी म्हणजे १ जुलै २०२५ पर्यंत, उज्वला योजनेअंतर्गत देशात सुमारे १०.३३ कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT