new parliament 
देश

बोगद्यातून संसदेत जाणार पंतप्रधान, उपराष्ट्रपती; अशी असणार आहे नवी संसद

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती संसदेतून बाहेर पडल्यानंतर खंडीत केल्या जाणाऱ्या वाहतुक व्यवस्थेने होणारा त्रास आता होणार नाहीये. कारण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत जी नवी संसद बनवली जाणार आहे, त्यामध्ये अशी एक सुविधा करण्यात येणार आहे, ज्यामुळे अनेक समस्या सुटणार आहेत. संसदेमध्ये असा एक बोगदा बनवला जाणार आहे, जो अंडरग्राउंड असणार आहे. तसेच संसदेतून थेट पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींच्या निवासाकडे जाणारा असेल. यामुळे सामान्य लोकांना व्हीआयपी मुव्हमेंट अंतर्गत त्रास होणार नाहीये. तसेच रस्त्यावरील वाहतुक सामान्य राहील. संसदेतील येणंजाणं सुरक्षित होण्यासाठी तसेच वाहतुकीवर त्याचा कसलाही परिणाम होऊ नये, म्हणूनच या बोगद्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. असे कमीतकमी तीन बोगदे बनणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

यामागील संकल्पना अशी आहे की, व्हीआयपी मुव्हमेंट वेगळ्या मार्गाने झाली तर वाहतुकीवर परिणाम होणार नाही. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत नवे पंतप्रधान निवास आणि पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकला असेल. नवे उपराष्ट्रपती निवास नॉर्थ ब्लॉकमध्ये असतील तसेच ट्रान्सपोर्ट आणि श्रम शक्ती भवनाजवळ खासदारांचे चेंबर्स असतील. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, हे बोगदे सिंगल लेन असतील. कारण याचा वापर खासकरुन काही लोकांद्वारेच केला जाणार आहे. राष्ट्रपती भवनाला याप्रकारे बोगद्याने जोडण्याची आवश्यकता नाहीये, कारण ते अगदी थोड्या अंतरावर आहे तसेच राष्ट्रपतींचं संसदेत येणं कमी आणि पूर्वनियोजित असतं. 

हेही वाचा - SpaceX च्या रॉकेटचं उड्डाणानंतर यशस्वी लँडिंग; मात्र काही क्षणातच स्फोट
सध्या सेंट्रल विस्टा आणि लुटीयंस बंगला झोनमधील अनेक भागांमध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे तसेच व्हिआयपींच्या वाहतुकीसाठी अनेकवेळा कडक व्यवस्था केली जाते. त्यामुळे सामान्य लोकांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. येणाऱ्या काळात व्हिआयपी रस्त्यांचा वापर फक्त 26 जानेवारीच्या परेडसारख्या कार्यक्रमांसाठीच केला जाऊ शकतो. सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्रिकोणाकृती संसदेच्या रचनेमध्ये 900 ते 1200 खासदार बसतील, अशी व्यवस्था असणारी ही नवी संसद असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, जाणून घ्या कारण

Indian Women Cricket Team : भारतीय महिला टीमचे कोच अमोल मुजुमदार; महिला वर्ल्डकप विजयानंतर कुंभारघर गावात आनंदाचा वर्षाव

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी अभियंत्यांवर गुन्हा दाखल!

World Cup जिंकताच, भारतीय खेळाडूंना लागली आणखी एक लॉटरी; जेमीमा, स्मृतीला प्रचंड नफा

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

SCROLL FOR NEXT