Unemployment esakal
देश

Unemployment : बेरोजगारी वीस वर्षांमध्ये दुप्पट झाली

‘माध्यमिक’नंतर अनेकजण शाळेबाहेर; गरीब, अल्पसंख्य घटकांची होरपळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील तरुणाईमधील बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत चालला असून साधारणपणे ८३ टक्के युवकांच्या हाताला काम नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) आणि मनुष्यबळ विकास संस्था (आयएचडी) यांनी संयुक्तरीत्या ‘भारतीय रोजगार अहवाल-२०२४’ प्रसिद्ध केला असून त्यात ही बाब मांडण्यात आली आहे. सुशिक्षीत तरुणांमधील बेरोजगारी वाढली असल्याचे निदर्शनास दिले आहे. यातील बहुतांश युवकांनी माध्यमिक शिक्षण घेतलेले आहे. साधारणपणे २००० ते २०२२ पर्यंतचा काळ लक्षात घेतला तर बेरोजगार युवकांची संख्या दुप्पट झाल्याचे दिसून येते. आधी हे प्रमाण ३५.२ टक्के होते ते थेट ६५.७ टक्क्यांवर पोचले आहे. केवळ माध्यमिक शिक्षणानंतरच शाळा सोडणाऱ्या तरुणांचे प्रमाण हे वाढल्याचे दिसून येते. गरीब राज्ये व अल्पसंख्य घटकांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा हा देखील चिंतेची बाब बनली आहे.

कोरोना परिस्थिती बिकट

साधारणपणे २००० ते २०१९ या काळामध्ये तरुणांना बऱ्यापैकी पूर्णवेळ आणि अर्धवेळ रोजगार मिळत असे. कोरोना काळामध्ये मात्र ते प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. सुशिक्षीत तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण याच काळात वाढले. मजुरांचा रोजगारातील सहभागाचा दर, कामगारांची संख्या व बेरोजगारीचा दर २००० ते २०१८ या काळामध्ये सातत्याने खालावल्याचे दिसून येते. यामध्ये २०१९ नंतर काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून येते.

लॉकडाउननंतर परिस्थितीत सुधारणा

कोरोनामुळे कामगारांच्या बाजारपेठेची सारी रचनाच बदलून गेली. लॉकडाउनचा फास सैल झाल्यानंतर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले. या संकटानंतर कामाचा दर्जा हा मोठ्या प्रमाणावर खालावल्याचे दिसून येते. स्वयंरोजगार आणि जिथे कोणत्याही प्रकारचा मोबदलाच मिळत नाही अशी कौटुंबिक कामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत.

हे उपाय करावे लागणार

देशाच्या श्रम बाजारपेठेचा विचार केला तर येणाऱ्या काही दशकांमध्ये आणखी ७० ते ८० लाख तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारला तातडीने उपाययोजना कराव्या लागतील. त्यात सर्वप्रथम रोजगार निर्मितीला प्रोत्साहन द्यावे लागेल, रोजगाराचा दर्जा सुधारावा लागेल, रोजगाराच्या बाजारपेठेतील विषमता दूर करावी लागेल, सक्रिय रोजगाराच्या बाजारातील कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याबरोबरच ज्ञानाबाबत असलेली दरीही दूर करावी लागेल.

तरुणाईमधील रोजगाराची स्थिती

वर्ष नियमित हंगामी स्वयंरोजगार

रोजगारप्राप्त रोजगारप्राप्त असलेले

२००० ५० टक्के १३ टक्के ३७ टक्के

२०१२ ४६ टक्के २१ टक्के ३३ टक्के

२०१९ ४२ टक्के २१ टक्के ३३ टक्के

२०२२ ४७ टक्के २८ टक्के २५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT