UNICEF Day 2022 esakal
देश

UNICEF Day 2022 : भारतात अल्पवयीन मुलांचे काय आहेत अधिकार? जाणून घ्या

लहान मुलांच्याविषयी जागरुकता वाढावी या उद्देशाने युनिसेफ दिवस साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

POSCO Children's Rights In India : लहान मुलांच्याविषयी जागरुकता वाढावी या उद्देशाने युनिसेफ दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश उपासमार, मुलांच्या अधिकारांचे हनन, मुलांचे शारीरिक, लैंगिक शोषण यापासून संरक्षणासाठी काम केलं जातं. या अंतर्गत अल्पवयीन मुलांना कोणकोणते अधिकार मिळतात जाणून घेऊया.

भारतीय मुलांनी आहेत कोणकोणते अधिकार?

मोफत शिक्षण : ६८व्या घटनादुरुस्ती कायदा २००२नुसार भारतीय राज्यघटनेतील कलम २१-अ हा मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे.

बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक कायदा २०१२ किंवा POCSO कायदा : त्याचा मुख्य उद्देश १८ वर्षांखालील मुलांना विविध लैंगिक गुन्ह्यांपासून तात्काळ संरक्षण करणे आहे.

बालकामगार : भारतात १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणे बेकायदेशीर मानले जाते. परंतु, 'बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, १९८६ मध्ये काही अपवाद आहेत, जसे कौटुंबिक व्यवसायात मुलं शाळेतून परत आल्यावर किंवा सुट्ट्यांमध्ये काम करू शकतात. शिवाय सिनेमा, टीव्ही, सिरियल्समध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे.

बाल विवाह : युनिसेफनुसार लग्नासाठी पुरूषांचं वय १८ तर महिलांचं वय २१ वर्ष असणं आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा-२००६ भारतात १ नोव्हेंबर २००७ मध्ये लागू करण्यात आला.

बाल तस्करी : १४ नोव्हेंबर २०१२ रोजी मुलांचे संरक्षण कायदा लागू करण्यात आला. हे मुलांना लैंगिक गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि कोणत्याही देशातील कोणत्याही व्यक्तीपासून रोखण्यासाठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT