देश

ट्रक-बसचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 19 जखमी

नामदेव कुंभार

ट्रक आणि डबल डेकर बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण गंभीर जखणी झाले असून प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटले जात आहे. आज, पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे लखनऊ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर डबल डेकर बसला ट्रकने मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला असून यामध्ये दुर्दैवी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जण जखमी झाले असून त्यांच्यावर लखनऊ ट्रामा सेंटर येथे उपचार सुरु आहेत. माहितीनुसार या अपघातातील मृत आणि जखमी झालेले लोक हे मजूर होते. डबल डेकर बस हरयाणावरुन बिहारला जात होती, त्यादरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला.

बाराबंकी येथे कल्याणी नदीच्या पूलावर डबल डेकर बस एक्सल तुटल्यामुळे खराब झाली होती. मुसळधार पावसामुळे बस रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली होती. चालक आणि वाहक बस दुरुस्त करत होते. मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे प्रवासी आतमध्येच होते. याचवेळी लखनऊकडे जाणाऱ्या एका ट्रकने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की काही जणांचा मृत्यू जाग्यावरच झाला.

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी ताक्ताळ घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर मदतकार्यही सुरु करण्यात आलं. बसमध्ये अडकेलेल्या इतर प्रवाशांना काढण्याचं काम सुरु आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास पाच किलोमीटर प्रर्यंत ट्रफिक जॅम झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT