UP Election
UP Election esakal
देश

'तू बसतोस की, मी बसू..'; मंचावरच भाजप नेत्यांत राडा

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवण्याची तयारी भाजपनं केलीय.

UP Election : उत्तर प्रदेश निवडणूक (Uttar Pradesh Election) हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवण्याची तयारी भाजपनं (BJP) केलीय. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोर्चे, जाहीर सभा होताना दिसताहेत. मात्र, असं असताना विरोधकांना उत्तर देण्याऐवजी भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पहायला मिळाले. स्टेजवर बसण्यावरून एवढा गदारोळ झाला की, लोक एकमेकांवर तुटून पडत होते. या कार्यक्रमादरम्यान जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे.

कनौजमध्ये भाजपच्या जनविश्वास यात्रेदरम्यान ही घटना घडलीय. छिब्रामाळ विधानसभा (Chhibramau Assembly Constituency) क्षेत्रातील नेहरू महाविद्यालयात (Nehru College) जनविश्वास यात्रेअंतर्गत जाहीर सभेसाठी स्टेज तयार करण्यात आला होता. व्यासपीठावर बसण्यावरून विद्यमान आमदार आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला. भाजपच्या विद्यमान आमदार अर्चना पांडे (Archana Pandey) यांच्या समर्थकांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. नगर दौऱ्यानंतर नेहरू महाविद्यालयात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

व्यासपीठावर बसण्यावरून आमदार समर्थक आणि जिल्हा उपाध्यक्षांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला. भाजपचे स्थानिक नेते विपीन द्विवेदी यांनी मंचावर बसण्यासाठी हा वाद केल्याचा आरोप आहेत. हे प्रकरण इतकं तापलं की, शिवीगाळ करण्याबरोबरच हाणामारी सुरू झाली. त्यामुळं काही काळ गोंधळ उडाला होता. या प्रकरणी विपीन द्विवेदी भाजपच्या विद्यमान आमदार अर्चना पांडे यांच्या समर्थकांवर मारहाणीचा आरोप करत आहेत. तर दुसरीकडं समाजवादी पक्षाचे माजी आमदार अरविंद यादव या प्रकरणाला भाजप नेत्यांमधील वर्चस्वाची लढाई असल्याचं सांगत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT