देश

नेपाळचे पंतप्रधान पोहोचले वाराणसीत; CM योगींनी केलं स्वागत

सकाळ डिजिटल टीम

वाराणसी: नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा वाराणसीमध्ये आले आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलंय. शेर बहादुर देउबा यांच्या स्वागतासाठी वाराणसी शहर मोठ्या प्रमाणावर सजवण्यात आलं आहे. आपल्या भारत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी शेर बहादुर यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. वाराणसी दौऱ्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांच्या फोटोंचे बॅनर्स रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. (Sher Bahadur Deuba)

वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये लावतील उपस्थिती

भारत दौऱ्यावर आलेल्या नेपाळी पंतप्रधान आज वाराणसीमध्ये काशी विश्वनाथांचं दर्शन घेणार आहेत. देउबा पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये 40 सदस्यीय प्रतिनिधीमंडळासोबत आले आहेत. यावेळी ते बाबा कालभैरवच्या दर्शनासोबतच काशी कॉरिडोरचे निरीक्षण देखील करतील. तसेच ते पशुपतिनाथ मंदिरातही जातील आणि रुद्राभिषेक करतील.

भारत-नेपाळ रेल्वेसेवा सुरु

शनिवारीच भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील संपर्क वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं गेलं आहे. तब्बल 8 वर्षांनंतर भारत आणि नेपाळदरम्यान पुन्हा एकदा रेल्वे सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे सेवेचे उद्घाटन केले. ही रेल्वे सेवा बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील (Nepal) जनकपूरमार्गे कुर्थाकडे धावणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा उद्यापासून म्हणजेच 3 एप्रिलपासून सुरू होणार आहे. रेल्वेच्या या सेवेमुळे दोन्ही देशांमध्ये जवळीकता येईल असे मत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि नेपाळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना सोबत पासपोर्ट ठेवणे बंधनकारक असणार आहे. (Sher Bahadur Deuba)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT