Yogi Adityanath BJP Minister Resinged esakal
देश

दररोज एक मंत्री, 3 आमदार भाजप सोडणार; माजी मंत्र्यांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) ऐन तोंडावर भाजपला गळती लागली आहे. आज तिसऱ्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पण, आता याच मंत्र्यांनी खळबळजनक दावा केला आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत भाजपचे (BJP) एक मंत्री आणि दोन किंवा तीन आमदार दररोज राजीनामा देतील, असं धरमसिंह सैनी यांनी म्हटलंय.

सैनी हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र, आज त्यांनी राजीनामा दिला. तीन दिवसांत राजीनामा देणारे ते तिसरे मंत्री आहेत, तर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या एक महिन्यापूर्वी भाजप सोडणारे ते तेरावे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला खूप मोठा धक्का बसला आहे.

सैनी यांनी भाजप सोडचिठ्ठी का दिली? -

धरमसिंह सैनी यांनी आज भाजपला रामराम ठोकला. पण, त्यांनी भाजप का सोडलं? असा प्रश्न विचारला असता पक्षात आपलं म्हणणं ऐकलं जात नाही, असं ते म्हणाले. "माझं म्हणणं ऐकायला कोणीच तयार नव्हतं. एक वेळ अशी आली होती की 140 आमदार धरणे करत होते आणि त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. तेव्हाच सगळ्यांनी ठरवलं होतं की वेळ आली की भाजपला उत्तर दिलं जाईल," असं धरमसिंह सैनी म्हणाले. तसेच सैनी यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यामुळे आता ते समाजवादीमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता याबाबत उद्या पुढील चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, त्यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत आहे, असं अखिलेश यादव म्हणाले आहेत.

आतापर्यंत या आमदारांनी सोडला पक्ष -

1. राधा कृष्ण शर्मा, बदायूं जिल्ह्यातील बिलसी येथील आमदार. 2. राकेश राठोड, सीतापूरचे आमदार. 3. माधुरी वर्मा, बहराइचमधील नानपारा येथील आमदार. 4. जय चौबे, संत कबीरनगरचे भाजप आमदार. 5. स्वामी प्रसाद मौर्य, कॅबिनेट मंत्री 6. भगवती सागर, आमदार, बिल्हौर कानपूर 7. ब्रिजेश प्रजापती, आमदार 8. रोशन लाल वर्मा, आमदार 9. विनय शाक्य, आमदार 10. अवतारसिंह भदाना, आमदार 11. दारा सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री 12. मुकेश वर्मा, आमदार १३, धरमसिंह सैनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगात भाजप कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT