Sanjay Raut on UP Election 2022 e sakal
देश

UP Election : 'भाजपला दुखवायचं नव्हतं म्हणून...', संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी देशातील इतर राजकीय पक्ष देखील सरसावले आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) देखील उत्तर प्रदेशात ५० ते १०० जागा लढणार आहे. पण, त्याठिकाणी शिवसेनेची युती नेमकी कोणासोबत असेल? याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माहिती दिली आहे.

शिवसेनेची युती कोणासोबत? -

शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत ५० ते १०० जागा लढणार आहे. त्यासाठी संजय राऊत आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. पण, शिवसेना याठिकाणी कोणासोबतही युती करणार नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे. कारण, शिवसेना आणि समाजवादी पक्षाची विचारधारा वेगळी आहे. पण, सर्व पक्षांना उत्तर प्रदेशात परिवर्तन हवं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

''भाजपला दुखवायचं नव्हतं म्हणून...''

शिवसेनेने आतापर्यंत उत्तर प्रदेश निवडणूक कधीही लढली नव्हती. मग यावेळी सेनेने का पुढाकार घेतला? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, ''आम्ही उत्तर प्रदेशात आतापर्यंत खूप काम केलं. पण, भाजपला दुखवायचं नव्हतं म्हणून आतापर्यंत इथं निवडणूक लढली नाही.''

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात ४०३ जागांसाठी मतदान पार पडत आहे. 10 फेब्रुवारी ते सात मार्चपर्यंत सात टप्प्यात पार पडणाऱ्या या मतदानाच्या प्रक्रियेचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. ही निवडणूक सात टप्प्यात होणार असून प्रामुख्याने भाजप आणि समाजवादी पक्षात लढत होण्याची शक्यता आहे. पण, देशातील इतर पक्षांनी देखील या निवडणुकीत सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस देखील उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. त्यांची समाजवादी पक्षासोबत युती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT