देश

वरुण गांधींचा भाजपला पुन्हा घरचा आहेर; आता थेट मोदींवरच निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असताना रात्रीची संचारबंदी आणि दिवसा हजारोंच्या प्रचारसभा कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी उत्तर प्रदेशात (UP Election 2022) दररोज मोठमोठ्या प्रचारसभा भाजपकडून घेतल्या जात आहेत. हजारो लोकांच्या उपस्थितीत विविध विकासकामांची उद््घाटने करण्यात येत आहेत. त्याबद्दल वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

‘‘रात्री कर्फ्यू लावणे आणि दिवसा प्रचारसभेत लाखो लोकांना बोलावणे हे सामान्य लोकांच्या आकलनापलीकडचे आहे,’’ अशी खंत वरुण गांधींनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. ‘‘उत्तर प्रदेशातील मर्यादित आरोग्य व्यवस्था लक्षात घेता ओमिक्रॉनला रोखणे की शक्तीप्रदर्शन करणे यात आपले प्राधान्य कशाला आहे, हे प्रामाणिकपणे ठरण्याची गरज आहे,’’ असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २५ डिसेंबर रोजी गाझियाबादमधील ‘जन विश्वास यात्रे’त उपस्थित होते. यासोबतच राज्यात अनेक प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ते एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. फक्त भाजपच नाही तर काँग्रेस, समाजवादी पक्षदेखील आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT