Yogi-Adityanath Team eSakal
देश

यूपीमधील लढत ८० विरुद्ध २० टक्के! योगींच्या वक्तव्यामुळे नवा वाद

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेशची (UP elections) निवडणूक म्हणजे ८० टक्के विरुद्ध २० टक्के अशी लढत असेल, असे वक्तव्य करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भाजप सत्ता निश्चितच राखेल असा आत्मविश्वास व्यक्त केला.

कितना बदला यूपी या विषयावर दूरदर्शनवर परिसंवाद झाला. त्याची सांगता करताना योगी म्हणाले की, आमचा पक्ष राष्ट्रवाद, सुशासन आणि विकास या मुद्द्यांवर निवडणूक लढवेल. ८० टक्के समर्थक एका बाजूला असतील, तर विरुद्ध बाजूला २० टक्के असतील. ८० टक्के जनता सकारात्मक उर्जेसह आगेकूच करेल, तर नेहमीच प्रतिकूल राहणारे २० टक्के आणखी विरोध करतील. भाजप मात्र सबका साथ-सबका विकास ही मोहीम पुढे नेण्यासाठी आणखी कार्य करेल आणि जिंकेल. गैरसमजाला बळी पडलेले काही जण लोकसंख्येच्या संदर्भात आपले अस्तित्व लादण्याच्या प्रयत्नात असल्याचे मी ठामपणे सांगू शकतो, असेही विधान त्यांनी केले.

२०१७ पूर्वी राज्यात दंगली व्हायच्या. अट्टल दंगलखोरांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सन्मानित केले जायचे. सरकार आणि पोलिस दंगलखोरांसमोर याचना करायचे. २०१७ नंतर बदल झाला. आज अट्टल दंगलखोर लपून बसले आहेत किंवा परलोकाच्या प्रवासाला गेले आहेत. २०१७ पूर्वी दहशतवादी हवे तेथे स्फोट घडवायचे, पण त्यानंतर एकही स्फोट किंवा दंगल झालेली नाही. हा फरक अगदी सुस्पष्ट आहे, असंही ते म्हणाले.

२० टक्के मुस्लिमांच्या संदर्भामुळे वाद

योगी आदित्यनाथ यांनी टक्केवारीबाबत अधिक भाष्य न केल्यामुळे तर्ककुतर्क लढविले जात आहेत. राज्यातील मुस्लिमांची टक्केवारी २० इतकी आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली. त्यामुळे वाद निर्माण झाला. ८० विरुद्ध २० टक्क्यांच्या विधानामागे निवडणुकीला जातीय रंग देण्याचा डाव आहे, पण जनता त्याकडे दुर्लक्ष करेल. खरे तर भाजपच्या वाट्याला येणाऱ्या मतांचा उल्लेख योगींनी केला आहे, जो २० टक्के इतका आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम असा मुद्दा निर्माण होणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी लोक मतदान करतील, असं मत समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी मांडलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT