Assembly Election 2022 News esakal
देश

यूपीत पुन्हा योगी सरकार, पंजाब-गोव्यात कोणता पक्ष मारणार बाजी?

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची धूमशान चालू आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची धूमशान चालू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यात (यूपी निवडणूक 2022) पुन्हा योगी सरकार सत्ता स्थापन करेल असा निकाल एका सर्वेक्षणात समोर आले आहे. यातून उत्तर प्रदेश राज्यातील सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपकडे देण्याच्या मनस्थितीत लोक असल्याचं सिद्ध होतं आहे. (Assembly Election 2022 News)

उत्तराखंडमध्येही असेच वातावरण आहे. या पहाडी राज्यात (उत्तराखंड निवडणूक 2022) भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात हे स्पष्ट झालं आहे. गोवा निवडणुकीत 2022 मध्येही भगवा पक्ष सरकार स्थापन करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, पंजाबमधील परिस्थिती बिकट आहे. या राज्यात (पंजाब विधानसभा निवडणूक 2022) कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. (Assembly Election 2022)

पाच राज्यांच्या या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशातील योगी सरकार राज्यात पुन्हा एकदा दमदार कमबॅक करतानाचे निकष दिसत आहेत. यूपीमध्ये विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपला 223 जागा मिळू शकतात, असा अंदाज प्रथमदर्शी समोर आला आहे. तर येथे सपाला 152 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बसपाला 13, काँग्रेसला 12 आणि इतरांना 3 जागा मिळणार असल्याचे सर्वेक्षण सांगत आहे.

यूपी विधानसभा (एकूण जागा- 403)

  • भाजप : 223

  • सपा : 152

  • बसपा : 13

  • काँग्रेस : 12

  • इतर: 3

दरम्यान या सर्वेक्षणात उत्तराखंड राज्यातही भाजपच झेंडा फडकवेल अशी स्थिती निर्माण होऊ शकते. येथेही पुन्हा एकदा भाजपच सत्ता स्थापन करणार असल्याचे समोर आले आहे. या पहाडी राज्यातील विधानसभेच्या 70 जागांपैकी, भाजपला 42 ते 46 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर याठिकाणी काँग्रेसला 12 ते14 जागा तर आम आदमी पार्टीला (AAP) 8-11 आणि इतरांना 2-5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तराखंड विधानसभा (एकूण जागा- ७०)

  • भाजप : 42-46

  • आप: 8-11

  • काँग्रेस : 12-14

  • इतर: 2-5

पंजाब विधानसभेचा निकाल मात्र थोडा किचकट असल्याचे समोर आले आहे. येथील सर्वेक्षणात कोणत्याचं पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. मात्र, आम आदमी पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असे दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यातील विधानसभेच्या 117 जागांपैकी 'आप'ला 58 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 44 जागा मिळू शकतात. तर अकाली दलाला 12, भाजपला 2 आणि इतरांना 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाब विधानसभा (एकूण जागा - 117)

  • आप : 58

  • काँग्रेस : 44

  • अकाली: 12

  • भाजप : 2

  • इतर:1

या सर्वेक्षणानुसार गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकार प्रस्थापित करेल असे निकष समोर आले आहेत. गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांपैकी भाजपला 20-23 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर याठिकाणी काँग्रेसला 4-6 जागा आणि 'आप'ला 6-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर पक्षांना 5-6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

गोवा विधानसभा (एकूण जागा- 40)

  • भाजपा : 20-23

  • काँग्रेस : 4-6

  • आपण: 6-10

  • इतर: 5-6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

SCROLL FOR NEXT