up power discom officer suspended for placing ladens photo in office  
देश

कार्यालयात लावला चक्क लादेनचा फोटो, सरकारी अधिकारी निलंबित

सकाळ डिजिटल टीम

फारुखाबाद (उत्तर प्रदेश) : अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनचा फोटो कार्यालयात लावल्याबद्दल एका सरकारी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे, इतकेच नाही तर या अधिकाऱ्यांने लादेन हा "जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता" असल्याचे देखील सांगितले, या प्रकरणात विद्युत विभागाच्या नवाबगंज उपविभागीय अधिकारी (SDO) यांना बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. (up power discom officer suspended for placing osama bin ladens photo in office)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणाचल विद्युत वितरण निगम लिमिटेड (DVVNL) चे उपविभागीय अधिकारी (SDO) रवींद्र प्रकाश गौतम यांनी त्यांच्या कार्यालयात बिन लादेनचा फोटो लावला होता, ज्यावर "जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता आदरणीय ओसामा बिन लादेन" असे कॅप्शन दिले होते. फोटो आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत एसडीओच्या निलंबनाचे आदेश दिले. यासोबतच कार्यालयातून लादेनचा फोटोही हटवण्यात आला आहे.जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, विद्युत विभागाच्या दक्षिणाचल विद्युत वितरण निगम लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक अमित किशोर दोषी आढळल्यानंतर रवींद्र प्रकाश गौतम उपविभागीय अधिकारी, नवाबगंज यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. दुसरीकडे, एसडीओ रवींद्र प्रकाश गौतम यांनी आपल्या कृत्याचा बचाव करताना सांगितले की, "कोणीही कोणालाही आपला आदर्श मानू शकतो आणि ओसामा हा जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता होता, हा फोटो काढून टाकण्यात आला आहे परंतु माझ्याकडे त्याच्या अनेक प्रती आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT