देश

दलित बाईच्या हातचं जेवण खाण्यास विद्यार्थ्यांचा नकार; पालकांकडूनही समर्थन

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून : उत्तराखंडमधील (Uttarakhand) चंपावत जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी दलित महिलेने (Dalit woman) बनवलेले माध्यान्ह्य भोजन (midday meal) खाण्यावर बहिष्कार घातला. गेल्या आठवड्यात घडलेल्या निंदनीय या घटनेनंतर राज्यात सामाजिक भेदभाव व जातीसंबंधी पूर्वग्रह यावर वाद सुरू झाला आहे.

सुखीढांग भागातील जौल गावातील सरकारी माध्यमिक शाळेत सुनीता देवी यांची नुकतीच भोजनमाता म्हणून नियुक्ती केली होती. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी माध्यन्ह्य भोजन बनविण्याची जबाबदारी त्यांच्यावर शाळा प्रशासनाने सोपविली होती. शाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता यांनी पहिल्या दिवशी तयार केलेले अन्न उच्च जातींमधील विद्यार्थ्यांनी खाल्ले होते. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी अन्नावर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली. एकूण ५७ विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जातीतील १६ विद्यार्थ्यांनी माध्यान्ह्य भोजन केले.

पालकांकडून समर्थन

भोजन करण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याऐवजी त्यांच्‍या पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवरच आरोप केले. शाळेत जेवण बनविण्यासाठी त्यांनी उच्च जातीमधील उमेदवाराची निवड जाणीवपूर्वक केली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शाळेतील पालक -शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जोशी म्हणाले की, गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत आम्ही पुष्पा भट या महिलेची भोजनमाता म्हणून नियुक्ती केली होती. तिचा मुलगाही याच शाळेत शिकतो आणि ती गरजूही होती. पण मुख्‍याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष करीत दलित महिलेची निवड केली. शाळेत उच्च जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अशा जातींमधील महिलेचीच या पदावर नियुक्ती करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

सर्व सरकारी निकषांनुसार ही नियुक्ती केली होती. भोजनमाती पदासाठी ११ अर्ज आले होते. या महिन्यात झालेल्या पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या खुल्या बैठकीत सुनीता देवी यांची निवड केली होती. काही पालक विनाकारण वाद निर्माण करीत आहेत, असं मत जौल माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंह यांनी मांडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: जात पडताळणी समितीत सरकारचा हस्तक्षेप नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे स्पष्टीकरण

दर्शन अग्नीचे

Dill Leaf Recipe: शेपूच्या पानांचा नवा ट्विस्ट! बनवा कर्नाटकातील प्रसिद्ध 'अक्की रोटी'

SCROLL FOR NEXT