Kashmira Sankhe 
देश

UPSC Result: ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली; यशामागे किरण बेदींचा राहिला प्रभाव

संघ लोकसेवा आयोगाचा अर्थात युपीएसची २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : संघ लोकसेवा आयोगाचा अर्थात युपीएसची २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ठाण्याची कश्मिरा संखे हीनं महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर रिचा कुलकर्णी हीनं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे ऑल इंडिया पहिल्या चार रँकमध्ये देखील मुलींनीच बाजी मारली आहे. (UPSC Result Thane Kashmiri number is first in Maharashtra Kiran Bedi impact on her)

कश्मिरा संखे हीनं निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "खूप काही अपेक्षा मी ठेवल्या नव्हत्या. पण आशा होती आणि सकारात्मकता ठेवली होती की यावेळी नक्कीच यश मिळवायचं आहे. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा फिलिंग होत होतं की, चांगला रँक येईल. तरी देखील ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे का रँकर लिस्ट आहे हे तपासून पाहिलं. पण ही रँकर लिस्ट असल्यानं त्यात माझा ऑल इंडिया २५ वा रँक आला" (Latest Marathi News)

लहानपणापासून युपीएससी करण्याचं माझं स्वप्न होतं. कारण किरण बेदींचा प्रभाव माझ्या आईवर होता त्यामुळं तिनं मला त्यांची पुस्तकं वाचायला दिली. तेव्हापासून मला वाटतं होतं की आपण युपीएससी करुयात. माझं शालेय शिक्षण आणि पदवी हे मुंबईतून झालं. डेन्टल सर्जरीमध्ये मी पदवी घेतली आहे. हे करताना मी लोकांच्या आरोग्यासाठी काम करत होते पण सिव्हिल सेवेत येऊन जास्त मोठ्या स्केलवर काम करता येईल, असं मला वाटलं त्यामुळं युपीएससी केली.

मानववंशशास्त्र हा विषय तीनं ऑप्शनचा विषय म्हणून घेतला होता. या तिसऱ्या प्रयत्नात ती युपीएससी पास झाली आहे. तिचा पहिलं प्राधान्य आयएएससाठी होतं तर दुसरं प्राधान्य आयएफएससाठी होतं. पण चांगली रँक आल्यानं आता आयएएस होण्याचं तीचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT