IAS-Srushti-Deshmukh
IAS-Srushti-Deshmukh 
देश

UPSC Success Story : वयाच्या 23व्या वर्षी 'यूपीएससी'त यश मिळवणारी सृष्टी!

सकाळ डिजिटल टीम

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) चा सन 2018चा निकाल जाहीर होऊन खूप दिवस लोटले तरी या निकालाची चर्चा पुढील निकालापर्यंत सुरूच राहते. याला कारणेही बरीच असतात. या स्पर्धेतील यशस्वीतांची भाषणे नव्या स्पर्धकांना प्रेरणादायी ठरत असतात. 

या स्पर्धेत देशात मुलींमध्ये टॉपर ठरली ती मध्य प्रदेशची सृष्टी देशमुख. सृष्टी मुलींमध्ये पहिली आणि पूर्ण देशात पाचवा क्रमांक (AIR 5) मिळवून उत्तीर्ण झाली. मुली मुलांपेक्षा काही कमी नाहीत, हेच तिने या निकालातून दाखवून दिले. याबद्दल तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला, अजूनही होत आहे. सध्या सृष्टी मसूरीतील लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये प्रशिक्षण घेत आहे.

या परीक्षेची तयारी आणि तिच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने शेअर केल्या. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली? कोचिंग क्लासेस आणि सेल्फ स्टडी या विविध विषयांवर ती म्हणाली, मी कोचिंग क्लासेस लावले होते. पण, क्लासेस लावले तरीदेखील तुम्हाला सेल्फ स्टडी करावाच लागतो. मी दररोज साधारण सहा तास अभ्यास करायचे. जसजशी परीक्षा जवळ येत गेली तसतसे अभ्यासाचा वेळ वाढत गेला. पण मला जाणवले की, जास्त वेळ अभ्यास केल्यानंतर त्याचा यशावर परिणाम होतो, असे मुळीच नाही. तुम्ही अभ्यास कसा करता हे महत्त्वाचे. 

परीक्षेची तयारी आणि सोशल मीडिया

सध्या सृष्टी मसूरीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळे ती बऱ्यापैकी सोशल मीडीयावर अॅक्टिव्ह असते. अधूनमधून ती काही फोटो पोस्टही करते. पण जेव्हा ती परीक्षेची तयारी करत होती त्यावेळी सोशल मीडिया वापरत होते का? असं विचारल्यावर सृष्टी म्हणते, मी या स्पर्धेची तयारी करत असताना सोशल मीडिया पूर्णपणे बंद केला होता. मी सोशल मीडियापासून दूर राहिले, पण अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर करत होते.

कारण मी या परीक्षेची तयारी भोपाळमध्ये माझ्या घरी करत होते. ऑनलाईन टेस्ट पेपरवर माझा जास्त भर होता, ज्याचा मला परीक्षेत खूप फायदा झाला. तसेच मागील काही वर्षाचे पेपरही मला इंटरनेटवरून मिळाले. टेन्शन घालवण्यासाठी मी गाणी ऐकायचे, तसेच रोज योग आणि ध्यानधारणा करायचे, असेही तिने सांगितले. 

अधिकारी होण्याचं स्वप्न !

लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहात होते. माझी 'आयएएस'साठी निवड होईल, हे मला स्वप्नातही वाटले नव्हते. या माझ्या प्रवासात बऱ्याच लोकांचा सहभाग आहे, ज्यांना माझ्या यशाचं श्रेय जातं, पण याचे जास्त श्रेय माझ्या पालकांना जाते. कारण त्यांनी मला नेहमीच साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन करत माझ्या पाठीशी उभे राहिले. 

सृष्टी विषयी :- 

पूर्ण नाव - सृष्टी जयंत देशमुख (भोपाळ)
- यूपीएससीमध्ये देशात पाचवा क्रमांक आणि मुलींमध्ये अव्वल
- 2018 मध्ये राजीव गांधी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीतून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पदवी उत्तीर्ण
- सृष्टीचा लहान भाऊ सातवीत शिकत आहे. आई शिक्षिका, तर वडील अभियंते आहेत.
- आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, सृष्टी वयाच्या 23 व्या वर्षी यूपीएससी ही देशातील सर्वात मानाची आणि खडतर परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT