Court
Court 
देश

मास्क वापरा, अन्यथा कोविड सेंटरमध्ये सेवा करा; या राज्याच्या उच्च न्यायालयाने केला आदेश जारी

पीटीआय

अहमदाबाद - कोरोना संसर्गाची दुसरी आणि तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाही नागरिक सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याबाबत सजग नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार सूचना दिल्या जात असल्या तरी नागरिक याकडे काणाडोळा करत आहेत. त्यामुळे गुजरातच्या उच्च न्यायालयाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांसाठी अनोखा आदेश जारी केला असून तो बंधनकारक करण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी, असे म्हटले आहे. सार्वजनिकरित्या मास्कचा वापर न केल्यास कोरोना सेंटरमध्ये पाच ते सहा तास सेवा संबंधितास करावी लागणार आहे. एवढेच नाही तर या सेवेचा कालावधी पाच ते पंधरा दिवसही असू शकतो. तसेच त्याचा कालावधी हा मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या पीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना आदेश दिला आहे. पीठाने म्हटले की, मास्कचा वापर न करणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करणे आता पुरेसे राहिले नाही. कारण कोरोनाचे भयंकर सावट असतानाही मास्ककडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. म्हणून अशा लोकांकडून दंड वसूल करावा आणि दंड न भरल्यास कोविड सेंटरमध्ये नॉन मेडिकल सेवा करून घ्यावी. यासाठी सरकारने एखाद्या संस्थेकडे जबाबदारी सोपवावी. मास्क वापरणे आवश्‍यक असून ती सर्वांसाठी गरज आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यावर राज्याने म्हटले की,  कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आले आहेत. १०८ रुग्णवाहिका सेवा आणि १०४ क्रमांकावर तत्पर सेवा मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि इंजेक्शनच्या मागणीत घट झाली आहे. येत्या काही दिवसात आणखी सुधारणा होऊ शकते, असा दावा करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कच्या वापरावर देखरेख करण्यासाठी चौकाचौकात पोलिस तैनात केले आहेत, असेही सांगण्यात आले.

सरकारने आदेश काढावा
मास्क न वापरणाऱ्या लोकांना कोरोना सेंटरमध्ये काम करण्यासंदर्भात गुजरात सरकारने अधिसूचना काढावी, असे आदेश न्यायालयाने दिला आहे. आदेश काढल्यास गुजरात राज्यात मास्क वापर अनिवार्य होईल, असे मत न्यायालयाने मांडले. दर आठवड्याला अंमलबजावणीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. 

जनहित याचिकेत काय म्हटले
ॲड. विशाल अवतानी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दहा ते पंधरा दिवस नॉन मेडिकल कम्युनिटी सेवा करण्याचे बंधन घालावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय राज्यातील चार मोठ्या शहरापैकी अहमदाबाद, सुरत, बडोदा आणि राजकोट येथे दंडातील रक्कम वाढवून २ हजार करावी, अशी मागणी केली.

दुसऱ्या-तिसऱ्या लाटेचे संकट
गुजरातमध्ये सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचे सावट आहे. अहमदाबादमध्ये रात्री संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन लाखाहून अधिक रुग्णांना बाधा झाली आहे. याशिवाय चार हजार जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT