mask
mask 
देश

‘मास्क’ने थोपवली कोरोनाची दुसरी लाट

सकाळवृत्तसेवा

लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी ‘मास्क’ वापरण्यावर कटाक्षाने भर दिल्यामुळे जगभरातील ‘कोविड-१९’ विषाणूच्या थैमानाला नियंत्रणात ठेवण्यात यश आले. ‘मास्क’मुळेच या जागतिक साथीची दुसरी लाट थोपवणे शक्‍य झाल्याचा निष्कर्ष ब्रिटिश अभ्यासकांनी काढला आहे. 

केम्ब्रिज आणि ग्रीनविच विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार ‘सार्स’ किंवा ‘कोविड-१९’ सारखे संसर्गजन्य आजार केवळ लॉकडाउनमुळे रोखणे शक्‍य नव्हते. याकाळात लोकांनी मास्क वापरल्यामुळेच संसर्ग रोखता आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना जगभरातील लोकांनी ‘मास्क’चा वापर करणे महत्त्वाचे होते, असे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञ रिचर्ड स्टट म्हणतात.

सध्या कोविड-१९ विषाणूबाधेवर कोणतेही औषध उपलब्ध नाही. औषध किंवा लस तयार होईपर्यंत लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्क घालणे अनिवार्य आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा सध्या तरी हा एकमेव मार्ग असल्याचे ते नमूद करतात. या संशोधनातील निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दि रॉयल सोसायटी़’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

‘कोविड-१९’ हा विषाणू नव्याने समोर आल्यामुळे फारशी माहिती उपलब्ध नाही. फेस मास्कच्या वापरामुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यात यश आल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. 

परिणामकारकता अंदाजापेक्षा कमी?
या संशोधनातून सहभागी नसलेल्या काही अभ्यासकांची मते वेगळी आहेत. मास्कची परिणामकारकता आपल्या अंदाजापेक्षा अत्यंत कमी असू शकते, असे मत ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे संसर्गजन्य रोग मॉडेल तज्ज्ञ ब्रुक्‍स पोलॉक यांनी व्यक्त केले. संशोधनाचे निष्कर्ष प्रोत्साहित करणारे आहेत. असे ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक त्रिशा ग्रीनहाल्घ यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT