Goa Assembly Elections 2022  Team eSakal
देश

BJP चा प्रामाणिकपणावर विश्वास नाही का? पर्रीकरांच्या मुलाचा सवाल

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रीकर यांनी देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजी व्यक्त केली.

सुधीर काकडे

गोव्याचे (Goa) माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी गुरुवारी भाजपविरोधात (BJP) सूर आवळला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून बोलताना, पक्षाचा प्रामाणिकपणा आणि चारित्र्यावर विश्वास आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष कुणालाही फक्त राजकारण्याचा मुलगा असल्याने तिकीट देऊ शकत नाही, असं फडणवीस बुधवारी म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांचा इशारा थेट उत्पल पर्रीकर यांच्याकडेच असल्याचं लक्षात आलं होतं. उत्पल हे पणजी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. "मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने काय म्हटले आहे यावर भाष्य करू शकत नाही, परंतु मी दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून मला तिकीट मागायचं असतं तर, पर्रीकर यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत मागणी तिकीट मागितलं असतं." असं म्हणत उत्पल यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, मनोहर पर्रीकर यांचं १७ मे २०१९ रोजी निधन झालं होतं. पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीही राहीले होते. मनोहर पर्रीकर यांनी पणजी विधानसभेचं चार वेळा प्रतिनिधित्व केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT