As a boy used to molest girls by wearing burqa police arrested him सकाळ डिजिटल टीम
देश

बुरखा घालून करायचा मुलींची छेडछाड, पोलिसांनी केली अटक

गेल्या दोन-तीन दिवसांपासून आरोपी तरुण बुरखा घालून सतत मुलींची छेड काढत होता

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमध्ये बुरखा घालून मुलींची छेडछाड करणाऱ्याला एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील बिजनौरच्या नजीबाबाद येथील ही घटना आहे. पुरुषी आवाज ऐकून त्याचा बुरखा उतरवण्यात आला, तेव्हा बुरख्यात तरुण असल्याचे उघडकीस आले. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुहेल असून तो नजीबाबाद येथील पठाणपुरा येथील रहिवासी आहे. (As a boy used to molest girls by wearing burqa, police arrested him)

गेल्या दोन-तीन दिवसांपासून आरोपी तरुण बुरखा घालून सतत मुलींची छेड काढत होता. शनिवारीही त्याने बसमध्ये मुलींचा विनयभंग केला. यानंतर त्याच्या आवाजावरुन तो मुलगी नसल्याचा संशय निर्माण झाल्याने काही लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी यानंतर आरोपीला बुरखा काढण्यास सांगितते मात्र आरोपी तरुण बुरखा काढण्यास तयार नव्हता. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने त्याचा बुरखा काढला तेव्हा बुरख्यात तरुण असल्याचे उघड झाले.

या प्रकपणी बिजनौर पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Personal Loan: जर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावे लागेल? पर्सनल लोनचे 'हे' नियम तुम्ही वाचलेत का?

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवणार

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

SCROLL FOR NEXT