देश

उन्नाव पीडितेच्या आईविरोधात 'समाजवादी' उमेदवार नसणार?

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: काँग्रेस पक्षाकडून (Congress) उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने महिलांना आणि पीडितांना प्रतिष्ठा देण्याच्या बाबतीत उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलाचं सर्वत्र कौतुक होत असताना आता समाजवादी पक्षानेही (Samajwadi Party) मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. समाजवादी पक्ष या मतदार संघातून कोणताही उमेदवार काँग्रेसच्या उमेदवार आशा सिंu यांच्याविरोधात उभा करणार नसल्याची माहिती समोर येतेय. काँग्रेसच्या उमेदवार आशा सिंह यांनी क्विंटशी बातचित करताना यांसदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजवादी पक्षाकडून त्यांना सांगितलं गेलंय की, त्या जागेवार त्यांच्याकडून कुणालाही रिंगणात उतरवण्यात येणार नाहीये.

गेल्या गुरुवारी काँग्रेसने त्या 50 महिला उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे ज्या आपल्या मुद्यासाठी सर्वांत पुढे राहिलेल्या आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई आशा सिंह यांचं होयं. त्या उन्नाव मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.

आशा सिंह यांनी म्हटलंय की, अखिलेश भैयाने नेहमीच मला साथ दिली आहे. पक्षानेही मला नेहमीच सोबत केलीय. मला असं समजलंय की, समाजवादी पक्ष या जागेवरुन कुणालाही रिंगणात उभं करणार नाहीये. मात्र, समाजवादी पक्षाचे उन्नावचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र सिंह यादव यांच्याशी याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलंय की, अद्याप तरी याप्रकारचा कसलाही आदेश आलेला नाहीये. माझ्याकडे पक्षाकडून असा कोणताही आदेश प्राप्त झालेला नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT