देश

UP Crime l दिल्ली पोलिस अधिकारी सांगून खंडणी मागणारे दोघे ताब्यात

संशयितातांवर गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली

सकाळ डिजिटल टीम

खंडणी गोळा केल्याप्रकरणी दोन बनावट निरीक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली जिल्ह्यातील इज्जतनगरमध्ये ही घटना घडलीय. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र, बनावट एअरगन आणि ४५०० रुपये जप्त करण्यात आले आहे. संशयितातांवर गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इज्जतनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्वोदय नगरमधील रहिवासी असलम खान आणि सीबीगंज पोलिस स्टेशन हद्दीतील सानिया राणी गावात राहणारा अमीर हमजा हे दोघे पोलिस असल्याची बतावणी करत नागरीकांकडून खंडणी वसूल करत होते. याबाबात परिसरातील नागरीकांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला यावेळी या दोघांना ताब्यात घेतले.

दिल्ली पोलिसांचे ओळखपत्र दाखवले दाखवत गुन्हेगाराशी संबंध असल्याचे धमकावून ६० हजाराची मागायला सुरुवात केली.

दिल्ली पोलिसांच्या गणवेशात दोघेजण आले होते. त्यांनी दिल्ली पोलिसांचे ओळखपत्र दाखवले दाखवत गुन्हेगाराशी संबंध असल्याचे धमकावून ६० हजाराची मागायला सुरुवात केली. कोणत्याही गुन्हेगाराशी संबंध नसताना धमकावून पाच हजार रुपये घेतल्याचे पीडितांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक रवींद्र कुमार यांनी सांगितले की, संशयतांकडून बनावट बंदूक, बुलेट प्रूफ जॅकेट, दिल्ली पोलिसांचे आय-कार्ड, आर्मी ड्रेस, मोनोग्राम, ४५०० रुपये रोख आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध इज्जतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कसून चौकशी करत असून खंडणीच्या इतर गुन्ह्यांची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT