Uttar Pradesh govt allows sale of high end liquor brands in shopping malls 
देश

आता मॉलमध्येही दारुविक्रीची होणार; उत्तरप्रदेश सरकारची तयारी

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने आता मॉलमध्येही दारूविक्री करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या शॉपिंग मॉल्समध्ये दारू आणि बियर विकता येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मॉल आणि दारूची दुकानं बंद आहेत. दारूविक्री बंद असल्यामुळे राज्य सरकारांचा महसूल मोठ्या प्रमाणावर आटला आहे. आता हा महसूल वाढवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मॉलमध्ये दारूविक्री करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून लायसन्स देण्यात येणार आहे. पण, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेशमधले शॉपिंग मॉल्स ३१ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळाने नियमांमध्ये बदल केल्यामुळे आता मॉलमध्येही दारूविक्री शक्य होईल. ही दुकानं सध्याच्या दुकानांपेक्षा अधिकची असतील. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची मोठी संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं उत्तर प्रदेशच्या महसूल विभागाचे मुख्य सचिवांनी सांगितलं आहे. 
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
---------
लायसन्ससाठी कोण अर्ज करु शकते?

  • 'कोणतीही कंपनी, व्यक्ती किंवा फर्म अथवा सोसायटी लायसन्ससाठी अर्ज करू शकतात.

मॉलमध्ये दारुविक्री करण्यासाठीचे नियम

  • मॉलमध्ये दारूविक्री करण्यासाठी या मॉलचं क्षेत्रफळ १० हजार वर्ग फूट असावं. 
  • मॉलमध्ये डिपार्टमेंटल स्टोर्स, सुपर मार्केट किंवा हायब्रिड हायपर मार्केट असणं बंधनकारक आहे.
  • दारूचं दुकान उघडण्यासाठी कमीतकमी ५०० वर्ग फुटाचा कॉर्पोरेट भाग असला पाहिजे.
  • ग्राहकांना त्यांचा आवडता ब्रॅण्ड पसंत करता आला पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रॅण्डच्या दारू दुकानात असल्या पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

PM Narendra Modi : रायगडाच्या संवर्धनासाठी खा. नीलेश लंके यांचा पुढाकार; संसदेत पंतप्रधानांशी चर्चा!

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

Santosh Deshmukh Case: कोर्टाने नाव पुकारलं अन् सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला; आरोपींकडून वेळकाढूपणा? देशमुख प्रकरणात काय घडलं?

Mumbai: वाहतूक कोंडी सुटणार! मुंबई ते पुणे फक्त ९० मिनिटांत आणि बेंगळुरू प्रवास ५ तासांत होणार, नवीन एक्सप्रेसवेची घोषणा

SCROLL FOR NEXT