Uttarakhand  esakal
देश

Uttarakhand: मुंबई पाठोपाठ या राज्यात बनावे फिल्म डेस्टिनेशन, अनुपम खेर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी राज्य सरकार राज्यात अनेक योजना राबवत आहे

Pooja Karande-Kadam

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी मंगळवारी सचिवालयात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. उत्तराखंडमधील चित्रीकरण आणि चित्रपट निर्मितीच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, राज्यात शूटिंगसाठी सर्वात सुंदर आणि सर्वोत्तम ठिकाणे आहेत. नैनिताल, मसुरी, औली, चक्रता, पिथौरागढ, मुन्सियारी, चोपटा, हरसिल आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सारखी सुंदर ठिकाणे उत्तराखंडमध्ये आहेत. ते म्हणाले की, उत्तराखंडमध्ये डेहराडून, हरिद्वार, ऋषिकेश तसेच बद्री-केदार धाम आणि गंगा-यमुना यासारख्या सदाहरित नद्या आहेत.

आपल्या राज्यातील हेच निसर्ग सौंदर्य मोठ्या पडद्यांवरून संपूर्ण जगापर्यंत पोहोचवल्याने राज्याचा विकास होईल. विदेशातील लोकही येथील पर्यटनस्थळांना भेट देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, चित्रपट निर्माते आणि वेब सिरीज बनवणारे निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी राज्य सरकार राज्यात अनेक योजना राबवत आहे. उत्तराखंडमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT