tirath singh rawat
tirath singh rawat 
देश

फाटक्या जीन्सनंतर देशाच्या इतिहासाबद्दल अजब वक्तव्य; तीरथ सिंह पुन्हा चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री महिलांच्या फाटक्या जीन्स घालण्यावरून केलेल्या वक्तव्याने वादात अडकले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले असून यावेळी त्यांची खिल्ली उड़वली जात आहे. भारताच्या इतिहासाबाबत त्यानी केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दीडशे वर्षे भारतावर इंग्रजांनी राज्य केलं. मात्र मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी एका वाक्यातच हा सगळा इतिहास वेगळा करून टाकत त्यांचे अज्ञान दाखवलं अशी टीका आता सोशल मीडियावरून होत आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सांगितलं की, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाशी लढण्यासाठी चांगले काम केले जात आहे. तर ज्या अमेरिकेनं आपल्याला 200 वर्षे गुलाम बनवलं आणि जगावर राज्य केलं ते सध्या संघर्ष करत आहेत. जागतिक वन दिनानिमित्त तीरथ सिंह रावत हे नैनिताल जिल्ह्यातील रामनगर इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी भाषणात त्यांनी इतिहासाचा चुकीचा संदर्भ देत वक्तव्य केलं.

तीरथ सिंह रावत यांनी सांगितलं की, कोरोना काळात सरकारकडून प्रत्येक घरात प्रति व्यक्ती 5 किलो धान्य देण्यात आलं. ज्यांच्याकडे 10 लोक होते त्यांना 50 किलो तर 20 लोक होते त्यांना एक क्विंटलपर्यंत धान्य दिलं गेलं. मात्र तरीही लोकांनी यावरून प्रश्न विचारले. 20 लोकांना जास्त रेशनचं धान्य मिळतं म्हणून कमी लोक असलेले जळतात. पण त्याची गरजच काय? जेव्हा वेळ होती तेव्हा तुम्ही दोन जन्माला घातलेत, 20 जणांना का जन्म दिला नाही असा अजब सवालही तीरथ सिंह यांनी विचारला.

तीरथ सिंह रावत यांनी पुढे सांगितलं की, कोरोनाच्या संकट काळात आपल्याला 200 वर्षे गुलाम बनवणाऱ्या अमेरिकेचं हाल झालं. इतर देशांच्या तुलनेत भारताना कोरोनावर चांगली मात केली. तर ज्या अमेरिकेनं 200 वर्षे आपल्याला गुलाम बनवलं होतं आणि जगावर राज्य केलं ते मात्र धडपडत आहेत. 

याआधीही तीरथ सिंह रावत हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना भगवान कृष्ण आणि प्रभू रामचंद्रांशी केली होती. तीरथ सिंह रावत यांनी असंही म्हटलं होतं की, एक दिवस लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींची पूजा करतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकाही केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT