uttarakhand
uttarakhand 
देश

उत्तराखंड दुर्घटनेशी चीन-अमेरिकेचा संबंध? 56 वर्षापूर्वी घटनेमुळे संशय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - उत्तराखंड सरकार चमोलीमध्ये ग्लेशियर तुटल्याच्या घटनेचा तपास करत आहे. यासाठी एक विभाग निर्माण करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडे अशीही मागणी केली जात आहे की, त्या रडार सिस्टीमचा शोध घ्यावा जी अमेरिकेनं 56 वर्षांपूर्वी हिमालयाच्या पर्वतरांगेत पाठवली होती. यामध्ये प्लुटोनियमने चालणारे कॅप्सूल होते. या रडारच्या सहाय्याने चीनवर नजर ठेवण्यात येणार होती. याबाबतची माहिती जलसिंचन मंत्री सतपाल महाराज यांनी सोमवारी दिली होती. 

सतपाल महाराज यांनी सांगितलं की, त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत एक विभाग तयार करण्यात येईल जो ग्लेशिअर्सची सॅटेलाइटमधून पाहणी करून अभ्यास करेल. जर ग्लेशिअर प्लुटोनिअममध्ये झालेल्या स्फोटामुळे तुटले असेल तर उत्तराखंड आणि गंगा नदीमध्ये धोकादायक रेडिएशन पसरू शकतात. 

1964 मध्ये चीनने अण्वस्त्र चाचणी केली होती. त्यानंतर 1965 मध्ये अमेरिकेनं भारतासोबत मिळून चीनवर नजर ठेवण्यासाठी एक करा केला होता. या अंतर्गत हिमालयात नंदा देवी पर्वतावर एक रडार लावण्यात येणार होतं. यामध्ये अण्वस्त्र उर्जेवर चालणारे जनरेटर लावले होते. या जनरेटरमध्ये प्लुटोनिअमचे कॅप्सूल होते. मात्र जेव्हा ही मशिन्स पर्वतावर आणण्यात येत होती तेव्हा वातावरण खराब झालं आणि पथकाला मागे परतावं लागलं होतं.

मशिन्स मात्र तिथेच राहील आणि नंतर ग्लेशिअरमध्ये हरवली होती. मशिन्स हरवल्यानंतर अमेरिकेनं त्याठिकाणी दुसऱी सिस्टिम लावली होती. आता शंका व्यक्त केली जात आहे की, चमोलीमध्ये ग्लेशिअर या प्लुटोनिअममुळे तर तुटले नाही ना. प्लुटोनिअम पॅक साधारणत: 100 वर्षापर्यंत प्रभावी असतं असं मानलं जातं. 

गेल्या आठवड्यात चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात ग्लेशिअर तुटल्यानं ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांना अचानक पूर आला होता. यामुळे इथं तयार केलेला एनटीपीसी हायड्रो पॉवर प्लांटही वाहून गेला. एका बोगद्यात चिखल साचला असून अद्याप बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 60 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय छिन्नविछिन्न झालेले अवयवही सापडले असून त्यांची ओळख डीएनएवरून पटवली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT