vaccine ad 
देश

लशीच्या तुटवड्याचं अमेरिका, युरोप कनेक्शन; आदर पूनावालांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असून अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असून लशीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. लशीच्या तुटवड्यावरून राजकारणही रंगलं आहे. दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं की, देशात कोरोना लस निर्मितीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. युरोप आणि अमेरिकेनं महत्त्वाच्या अशा कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यानं लस निर्मितीत अडथळा येत आहे. 

कोरोना लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. याचं कारण काय असा प्रश्न विचारला असता आदर पूनावाला म्हणाले की, माझी इच्छा आहे की मी अमेरिकेत जाऊन स्वत: याचा विरोध करावा. तुम्ही महत्त्वाचा असा कच्चा माल रोखला आहेत जो कोव्हॅक्सिन आणि भारतासह जगभरातील इतर देशांमध्ये लशीसाठी गरजेचा आहे. व्हॅक्सिन निर्मितीत यामुळे अडथळा येत आहे. 

सर्वात मोठा हा अडथळा असून आम्ही यासाठी संघर्ष करत आहे कारण आम्हाला याची अजुनही गरज आहे. आम्हाला सहा महिने किंवा एक वर्षानंतर याची गरज नाही. तोपर्यंत आम्ही दुसरा पुरवठादार शोधू किंवा तयार करू असंही आदर पूनावाला म्हणाले. सीरम चीनकडून कच्चा माल घेत नाही. क्वालिटी आणि कमी पुरवठा ही त्यामागची कारणे असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

आदर पूनावाला म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूट महिन्याला 6 ते 6.5 कोटी लशींचे डोस तयार करते. सीरम यावर्षी जून महिन्यापर्यंत 10 ते 11 कोटी लशींचे डोसची निर्मिती करण्यासाठी तयार आहे. आदर पूनावाला म्हणाले की, आम्ही भारतीयांना प्राधान्य देत असून यासाठी सरकारसोबत काम करत आहे. सरकारने दोन ते तीन महिन्याच्या कालावधीसाठी लशीची किंमत स्थिर ठेवण्यासाठी आणि भारतात पुरवठा करण्याबाबत सरकारची विनंती मान्य केली असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली. 

जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी संस्था म्हणून सीरम इन्स्टिट्यूटची ओळख आहे. एस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने दिली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT