Valentine Day 
देश

'व्हँलेटाईन डे'ला दिली फाशी, आग्र्यातील धक्कादायक घटना

व्हँलेटाईन डेला दिली फाशी, आग्र्यातील धक्कादायक घटना

सकाळ डिजिटल टीम

Viral Video: जगभरात आजचा दिवस हा व्हँलेटाईन डे (Valentine Day) म्हणून उत्साहात साजरा केला जातो. केवळ तरुण तरुणीच नाहीतर आबालवृद्धांमध्ये देखील आजच्या दिवसाचं महत्व आहे. आपल्या (Social Media News) आवडत्या व्यक्तीला या दिवशी तिच्या किंवा त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करणं, ते व्यक्त करुन त्याच्याप्रती प्रेम जाहीर करणं ही त्या दिवसामागील भावना आहे. काहींचा या दिवसाला विरोध असल्याचे दिसून आले आहे. सध्या आग्र्यातील घटनेनं सोशल मीडियावरुन लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामध्ये व्हँलेटाईनच्या दिवशी त्याच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी दिल्याचे दिसून आले आहे. काही संघटनांनी त्याला विरोध केला आहे. Valentine Day special agra protest hang video viral

जगभरामध्ये व्हँलेटाईन डे (Valentine Day) उत्साहात साजरा केला जातो. तो साजरा करताना त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनाही पुढे येतात. मात्र हा दिवस अनेकांच्या नाराजीचा असल्याचे दिसून आले आहे. भारतात काही धार्मिक संघटनेच्या लोकांनी या डे ला विरोध केला आहे. त्यासाठी त्यांनी व्हँलेटाईनचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन त्याला आग्र्याच्या भरचौकात फाशी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर तो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. आग्रा शहरात ताजमहाल आहे. जे प्रेमाचे प्रतिक असल्याचे सांगितले जाते.

सोशल मीडियावर एक व्हिड़िओ ट्रेंड होतो आहे. त्या व्हिडिओमध्ये एका पुतळ्याला फाशी दिल्याचे दिसून येते. त्या पुतळ्याच्या खाली व्हँलेटाईन असे लिहिले आहे. तसेच जो जमाव त्या घटनेत सहभागी झाला आहे तो जय श्रीरामच्या नावाचे नारे देताना दिसत आहे. याप्रसंगी एका व्यक्तीनं सांगितलं की, काल रात्री आम्ही व्हँलेटाईनला पकडलं होतं. त्यानं आम्हाला सांगितलं की भारताचा नाही तर विदेशातील आहे. माझं नाव व्हँलेटाईन आहे. अशा प्रकारची प्रतिकात्मक प्रतिक्रिया त्या व्यक्तीनं दिली आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी व्हँलेटाईन डे ला विरोध केला आहे. यामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बागेत फिरणाऱ्या आणि बसणाऱ्या जोडप्यांचे त्या पार्कमध्येच लग्न लावून देण्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer Injury Update: श्रेयसला ICU मध्ये हलवलं; बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे झालाय आंतरिक रक्तस्राव, डॉक्टर म्हणतायेत...

Satara News: 'लालपरी राजकारणाला, प्रवासी मात्र वेठीला'; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला २०० गाड्या, जनता रस्त्यावरच..

Prithvi Shaw : १८ चेंडूंत ७२ धावा… पृथ्वीचे वादळी शतक, Ranji Trophy स्पर्धेच्या इतिहासातील सहावी वेगवान Century

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

SCROLL FOR NEXT