Valentines Day 2023 esakal
देश

Valentines Day 2023 : प्रियसीच्या ‘त्या’ चुकीमुळे मिर्झा-साहिबा यांचे प्रेम अमर झाले!  

ती अविश्वासू नव्हती, फक्त ती बरोबर चूक ठरवू शकत नव्हती

सकाळ डिजिटल टीम

दानाबाद गावातील खरल समुहातील एक मुलगा. लहानपणापासून मामाकडे रहायला होता. मामाच्या मुलीसोबत लहानपणापासून खेळून तो मोठा होतो. आणि साहजिकच तिच्या आकंठ प्रेमात पडतो. पण, हि गोष्ट मामाच्या मुलाला आवडत नाही, आणि तो त्याचा जीव घेतो. हि ऑनर किलींगची कहाणी आजच्या काळातील वाटत असली तरी ती अनेक वर्ष जूनी आहे.

 एक मुलगा मिर्झा आणि दानाबाद गावात जन्मलेल्या त्याच्या मामाची मुलगी साहिबा यांची ही कथा आहे. मिर्झा लहानपणापासून आपल्या मामाच्या घरी राहत असे. मिर्झा आणि साहिबा लहानपणापासूनच एकमेकांसोबत खेळत मोठे झाले. बालपणीच्या या सहवासाचे रूपांतर तारुण्यात प्रेमात झाले होते.

घरातील इतर मुलांनी यात ढवळाढवळ केली नसती तर कदाचित मिर्झा साहिबा एकत्र आले असते. साहिबाचे वडिल वांजल खान यांचा या नात्याला विरोध नव्हता. पण साहिबाचा भाऊ शमीर याने या नात्याला विरोध केला.

एकीकडे, जिथे मिर्झा आपले प्रेम सर्वात मोठे मानत होते. तर दुसरीकडे, शमीरला विश्वास होता की, त्याच्या बहिणीसाठी कुटुंब अधिक महत्वाचे असेल. शमीरने कसेतरी मिर्झाला त्याच्या गावी दानाबादला पाठवले आणि साहिबाचे लग्न इतरत्र निश्चित केले. जेव्हा मिर्झाला हे कळले तेव्हा त्याने कोणताही विचार न करता उत्साहाने घोड्यावर स्वार होऊ साहिबाला पळवून आणायचे ठरवले.

तो त्यात यशस्वीही झाला. साहिबाला सोबत घेऊन दोघेही खूप पुढे आले होते. वाटेत विसाव्याच्या ठिकाणी मिर्झा थांबला. साहिबासोबत झाडाच्या सावलीत शांतपणे बसून मिर्झा थोडावेळ झोपी गेला. दरम्यान, साहिबाच्या भावांनी त्यांचा पाठलाग केला. वास्तविक तिला मिर्झाची ताकद माहीत होती. तिचे भाऊ त्याच्या बाणांपुढे टिकणार नाहीत हे तिला माहीत होते. त्यामूळे तिनेच मिर्झाचे बाण तोडले होते. तिने आपल्या भावांनाच समजवण्याचे ठरवले.

काही वेळातच ते दोघेही चारी बाजूंनी घेरले गेले. मिर्झा आपले बाण शोधत होता पण सर्व बाण तुटलेले होते. हे साहिबानेच केल्याचे त्याला समजले. येथे साहिबाच्या भावांनी मिर्झाला ठार मारले. साहिबाला त्याचा मृत्यू सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली.

साहिबाने जे केले ते कुटुंबाच्या भावांच्या प्रेमापोटी केले. ती अविश्वासू नव्हती, फक्त ती बरोबर चूक ठरवू शकत नव्हती. कारण, तिचे मिर्झा भाऊ या दोघांवरही त्यांचे प्रेम होते. पण, तिने केलेल्या या चुकीमुळे मिर्झा आणि साहिबा दोघांचाही जीव गेला हे सत्य बदलता येणार नाही. असे असले तरी त्या दोघांची प्रेम कहाणी इतिहासात अमर झाली हे खरे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT