M. Venkaiah Naidu सकाळ डिजिटल टीम
देश

भगव्या रंगात वाईट काय? व्यंकय्या नायडूंचे भगवेकरणाला समर्थन

भाजपांनी शिक्षणाचे भगवेकरण केले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ डिजिटल टीम

गुजरात सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना भगवद्‌गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली. यावरुन भाजपांनी शिक्षणाचे भगवेकरण केले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी प्रतिक्रिया दिली.

भगव्या रंगात वाईट काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिक्षणाचे होत असलेल्या भगवेकरणाचे समर्थन केले आहे. हरिद्वारमधील देवसंस्कृती विश्वविद्यालयात साऊथ एशियन इन्स्टिट्युट ऑफ पीस रिकन्सिलिएशन या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी व्यंकय्या नायडू बोलत होते.

व्यंकय्या नायडू म्हणाले, “भारतीयांनी वसाहतवादी विचारांचा त्याग केला पाहिजे. भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा आहे आणि आपण त्या जपल्या पाहिजे. देशातील शिक्षणाचे भारतीयकरण करणे आवश्यक आहे, हेच नव्या शैक्षणिक धोरणांचे महत्त्वाचे सुत्र राहील.”

व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, “आपण इतर भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मातृ भाषेवर प्रेम करायला हवे. भारतीय संस्कृतीत चांगल्या गोष्टीचे वर्णन केले आहे. ते जाणुन घेण्यासाठी संस्कृत शिकणे आवश्यक आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT