Ajendra bahadur singh Sakal media
देश

व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह पश्चिम नौदल विभागाचे मुख्याधिकारी

कृष्ण जोशी

मुंबई : व्हाईस अॅडमिरल (vice Admiral) अजेंद्र बहादूर सिंह (Ajendra bahadur singh) यांनी आज नौदलाच्या पश्चिम विभागाचे (Navy west department) मुख्याधिकारी (Chief) म्हणून कार्यभार स्वीकारला. अॅडमिरल हरीकुमार (Admiral harikumar) यांनी आज नौदलप्रमुख (Navy chief) म्हणून सूत्रे स्वीकारल्याने रिक्त झालेल्या या पदावर अजेंद्र बहादूर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. हा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी सिंह यांनी नौदलाच्या पूर्व विभागाचे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. असा बहुमान फारच थोड्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे.

1 जुलै 1983 रोजी नौदल सेवेत नियुक्त झालेले, व्हाईस अॅडमिरल सिंह हे नॅव्हिगेशन तज्ञ आहेत. त्यांचे सैनिकी शिक्षण खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून झाले असून मद्रास विद्यापीठातून त्यांची पहिली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी सन 2005 मध्ये ब्रिटनच्या क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर्स पदवी देखील मिळवली.

अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी असलेल्या अजेंद्र सिंग यांनी आपल्या नौदल कारकिर्दीत अनेक प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. त्यांना 2012 मध्ये रिअर अॅडमिरल या पदावर पदोन्नती मिळाली. तर 2015 मध्ये व्हाईस अॅडमिरल म्हणून पदोन्नती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT