BRS and BJD leaders boycott Vice President election, sparking major political debate in India.

 

esakal

देश

Vice President election 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आता ‘या’ दोन पक्षांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Vice President election Update : जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे रिक्त असलेल्या या पदासाठी आता उद्या निवडणूक होत आहे.

Mayur Ratnaparkhe

BRS and BJD boycott Vice President election : देशाला उद्या(मंगळवार) नवीन उपराष्ट्रपती मिळणार आहेत. कारण, उपराष्ट्रपतीसाठी उद्या मतदान होणार आहे. यावेळी या महत्त्वपूर्णपदासाठी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान या निवडणुकीच्या मतदानापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या निवडणुकीपासून दूर राहण्याची घोषणा बीआरएस आणि बिजू जनता दल या राजकीय पक्षांनी केली आहे. या दोन्ही पक्षांनी मतदानाच्या आदल्या दिवशी असा मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक आरोग्याच्या कारणास्तव  उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे रिक्त असलेल्या या पदासाठी आता मध्यावधी निवडणूक होत आहे. उद्या म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तयारी दरम्यान, सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडी यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात ही एक प्रतिष्ठेची लढाईच मानली जात आहे.  

आता बीजेडी आणि बीआरएसने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही, अकाली दल, झेडपीएम आणि वीओटीटीपीचे प्रत्येकी एक खासदार आणि तीन अपक्ष खासदारांनी अद्याप त्यांच्या पसंतीचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. तरी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेतील खासदारांची संख्या पाहिल्यास, एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना बहुमत मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. 

दरम्यान, बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव म्हणाले, की त्यांचा पक्ष उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहील. त्याचप्रमाणे, बीजेडी नेते सस्मित पात्रा यांनीही सांगितले की, बीजू जनता दल देखील मंगळवारी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीतून दूर बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत पक्षाच्या खासदारांना मतदान करण्यापासून दूर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी, राजकीय व्यवहार समितीचे सदस्य आणि खासदारांशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पात्रा यांनी सांगितले आहे की, आमचे संपूर्ण लक्ष राज्याच्या आणि साडेचार कोटी लोकांच्या विकासावरच आहे.

तेलंगणातील शेतकऱ्यांमध्ये युरियाच्या कमतरतेसाठी काँग्रेस आणि भाजप दोघांवरही आरोप करत रामाराव म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप दोघेही या टंचाईचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. युरियाची कमतरता इतकी गंभीर आहे की रांगेत उभे राहून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी होत आहे. अशा परिस्थितीत, आम्ही मतदान करण्यापासून दूर राहू. आम्ही त्यात भाग घेणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT