Brijbhushan Singh 
देश

मनसेनं मारहाण केलेले उत्तर भारतीय थेट बृजभूषण यांच्या पत्रकार परिषदेत!

बृजभूषण सिंहांचा राज ठाकरेंना विरोध कायम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. त्यांचा विरोध अद्यापही कायम असून आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मनसेनं मारहाण केलेल्या उत्तर भारतीयांना समोर आणलं आणि त्यांच्यावर कसा अन्याय-अत्याचार झालाय हे सांगण्याचा प्रयत्न केला. (Victim North Indians who beaten by MNS workers seen at MP Brijbhushan Singh press conference)

बृजभूषण सिंह म्हणाले, राज ठाकरेंना अयोध्येत येऊ द्यायचं की येऊ द्यायचं नाही हे पुढं ठरवलं जाईल पण तत्पूर्वी मी काही लोकांना इथं घेऊन आलो आहे. सन २००८ मध्ये मनसेनं परप्रांतियांना विरोध करताना त्यांना मारहाण केली होती. यामध्ये १३ लोकांना मारहाण झाली होती यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला तर इतर अकरा जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले होते. यांपैकी सुलतानपूर येथील महेश यादव नामक तरुणाला यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत समोर आणलं. त्याला आपला शर्ट काढून पाठीवर मानेवर झालेल्या जखमा पत्रकारांना दाखवायला लावल्या.

त्याचबरोबर ब्रह्मदेव नामक एका उत्तर भारतीय व्यक्तीला बृजभूषण यांनी समोर आणत त्याच्या छोट्या भावाला रेल्वेमध्ये बेदम मारहाण करुन त्याची हत्या करण्याचा आल्याचा दावाही त्यांनी केला. "कामासाठी आपला भाऊ मुंबईला गेला होता, मनसेनं परप्रांतियांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर तो घरी परतण्यासाठी निघाला होता. यावेळी रेल्वेमध्ये काही मनसेचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी मनेसेचं नाव घेतलं तसेच राज ठाकरेंचं नाव घेऊन घोषणाबाजी केली. तसेच उत्तर भारतीयांना वेगळं उभं करुन त्यांच्याशी गैरवर्तन केलं. माझ्या भावानं त्याला विरोध केला तेव्हा त्याला इतकी बेदम मारहाण केली की, त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बायकोच्या पोटात अडीच महिन्यांचं बाळ होतं त्यामुळं त्याचा वारसदार आज आहे, अशी भावावर बेतलेली आपबिती यावेळी ब्रम्हदेव यांनी कथन केली.

तसेच एक सिंकदर खान नामक एका रिक्षा ड्रायव्हरलाही बृजभूषण सिंह यांना समोर आणत त्यांच्यावरही मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ओढवलेल्या वाईट प्रसंगाची माहिती द्यायला सांगितलं. अशा प्रकारे राज ठाकरेंवरील आरोप चुकीचे असल्याचं जे सांगतात त्यांना मी हे दाखवू इच्छितो असं यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत रेल्वे आता स्लीपर कोचमध्ये, 'या' मार्गावर धावणार; पैसा आणि वेळेचीही होईल बचत

Nagpur Munciple Election 2025 : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून अपक्ष उमेदवाराला घरातच कोंडलं

Latest Marathi News Live Update :ताम्हिणी घाटात अपघात, २५ जण जखमी

Navi Mumbai Crime : ऑनलाईन मैत्री ठरली जीवघेणी, दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण अन् मागितली २० लाखांची खंडणी

Bribery Action: बुलढाण्यात सहायक वनसंरक्षक व लिपिकाला १५ हजारांची लाच घेताना पकडलं, लाचलुचपतच्या कारवाईने खळबळ!

SCROLL FOR NEXT