Delhi Metro Viral Video Esakal
देश

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमधील 'तो' व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? 'डीपफेक' असल्याचा संशय

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये कधी डान्स तर कधी जोरदार भांडणे यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेचा ठरला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये कधी डान्स तर कधी जोरदार भांडणे यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेचा ठरला आहे. मेट्रोमध्ये दोन तरूणी अश्लीलपणे होळी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये कधी डान्स तर कधी जोरदार भांडणे यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी दोन मुलींचा मेट्रोमध्ये अश्लील पद्धतीने होळी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मेट्रोमध्ये होळी खेळणाऱ्या मुलींच्या या व्हिडिओने लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा डीपफेक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मेट्रो पोलिसांसह इतर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतरच व्हिडिओबाबत सत्यता समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या सर्व व्हिडिओ तपासले जात आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन मुली मेट्रोत खाली बसल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर रंग लावलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. 2013 च्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या रामलीला चित्रपटातील अंग लगा दे रे हे लोकप्रिय गाणे व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर लावलं आहे. सध्या एजन्सी व्हिडिओची चौकशी करत आहेत.हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा असल्याचा दावा ट्विटरवर केला जात आहे, मात्र 'सकाळ' या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

व्हिडिओमध्ये पांढरी साडी आणि सूट घातलेल्या दोन मुली मेट्रोच्या आत एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी भरपूर गुलाल देखील उधळला.  'आंग लगा दे रे, मोहे रंग लगा दे रे, मैं तो तेरी जोगनिया, तू जोग लगा दे रे, प्रेम का रोग', या गाण्यावर मुलींनी आक्षेपार्ह वर्तन केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  'X' वर SM Faris @farismohaab नावाच्या हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. मुली व्यतिरिक्त मेट्रो कोचमध्ये इतर प्रवासी दिसत आहेत.

डीपफेक व्हिडिओ कसा ओळखाल?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी सर्वांत आधी व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तिच्या डोळ्यांना पाहा. जर तुम्हाला आवाज, एक्सप्रेशन आणि स्टेबल डोळे दिसले तर तो व्हिडिओ डीपफेक आहे असे म्हणता येईल. वास्तविक व्हिडिओमध्ये, डोळ्यांच्या हालचाली सामान्य असतात आणि आवाजाशी समन्वय साधतात. त्याच वेळी, डीपफेक व्हिडिओमध्ये, रंग आणि प्रकाश दोन्ही विचित्र दिसतील.

कुठे तक्रार करायची

तुम्ही डीपफेक किंवा सायबर फसवणुकीचे बळी ठरल्यास, हेल्पलाइन 1930 वर तक्रार करा. याशिवाय राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in तयार करण्यात आले आहे. यावर २४ तास तक्रारी नोंदवता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT