Haryana Vidhan Sabha Election 2024 RSS Strategy For BJP Esakal
देश

Vidhan Sabha Election Haryana: विधानसभा जिंकण्यासाठी 'हा' फॉर्म्युला वापरण्याचा 'RSS'चा भाजपला सल्ला

RSS On Vidhan Sabha Election 2024: दरम्यान, काँग्रेस आणि भाजपने राज्यात प्रचाराची आणि निवडणुकीची रणनीती बनवण्याची तयारी सुरू केली आहे. तिकीट वाटपाबाबतही दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहे.

आशुतोष मसगौंडे

हरियाणामध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सर्व संलग्न संघटनांनी कंबर कसली आहे. तिकीट वाटपापासून निवडणुकीतील रणनीती तयार करण्यापर्यंत सर्वच बाबतीत संघाने पुढाकार घेतला आहे.

हरियाणाची ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी संघ भाजपला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढवणे आणि 60 टक्के जागांवर विजय मिळवण्यावर भर देत आहे. इतकेच नव्हे तर हो योजना सत्यात उतरवण्यासाठी 70 टक्के जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची सूचनाही संघाने भाजप हायकमांडला केली आहे.

संघाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर असे समोर आले की कार्यकर्त्यांची नाराजी, अंतर्गत वाद, अतिआत्मविश्वास आणि समन्वयाचा अभाव यामुळे पक्ष अर्ध्याहून अधिक बूथमध्ये प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे पडला आहे. ज्या बूथवर पक्षाचे उमेदवार पिछाडीवर पडले, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची उदासीनता असल्याचे वृत्त अमर उजालाने दिले आहे.

भाजप नेतृत्वाने संघाचा अहवाल फेटाळला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेतृत्वाला संघाचा अहवाल मान्य नाही. त्यामुळे जुन्या नेत्यांवरच विश्वास दाखवावा, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा आहे. भाजपने प्रत्येक जागेसाठी दावेदारांची यादी तयार केली आहे.

अशा स्थितीत 23 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेऊन पक्ष पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यातील विधानसभेच्या 90 जागांवर 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि भाजपने राज्यात प्रचाराची आणि निवडणुकीची रणनीती बनवण्याची तयारी सुरू केली आहे. तिकीट वाटपाबाबतही दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT