Vikas Dubey encounter, UP gangster, Vikas Dubey killed  
देश

तुला वेगळा नजारा बघायला मिळेल, विकास दुबे प्रकरणातील आणखी काही बाबींची उकल

सुशांत जाधव

कानपूरमध्ये 2 जुलैच्या रात्री जेसीबीच्या साहाय्याने पोलिसांचा रस्ता रोखणाऱ्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. पोलिस कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या प्रेम प्रकाश पांड्ये आणि विकास दुबेच्या संपर्कात होतो, असे त्यांनी चौकशीदरम्यान कबुल केले आहे. जेसीबीने पोलिसांच्या वाटेत अडथळा निर्माण केल्यानंतर आज एक वेगळा नजारा पाहायला मिळेल, असे विकास दुबे म्हणाला होता, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिली. 2 जुलैच्या रात्री उत्तर प्रदेशात दहशत निर्माण करणाऱ्या विकास दुबेच्या टोळीने घरी पकडण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर गोळीबार केला होता. यात एका अधिकाऱ्यासह 8 जण मृत्यूमुखी पडले होते. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या विकास दुबेचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केला होता. या प्रकरणात संबंधित असणाऱ्यांचा पोलिस अद्यापही शोध घेत असून या घटनेमध्ये पोलिसांचा रस्ता अडवणाऱ्या जेसीबी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नारेपुरवा शिवलीचा रहिवाशी असलेल्या राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकाश पांड्येने त्याच्याकडे गावातील जंगल परिसरातील झाडे तोडण्याचे काम दिले होते. विकास दुबेला या जमीनीवर कब्जा करायचा होता.  याठिकाणच्या बऱ्याच भाग विकास दुबेने बळकावलाही होता. ज्यादिवशी कानपूरमध्ये पोलिसांवर गोळीबाराची घटना घडली त्यावेळी त्यावेळी सायंकाळच्या दरम्यान प्रेम प्रकाशसोबत राहुल जंगलातील झाडे तोडण्याचे काम करत होता. रात्री 9 वाजता विकास दुबेने प्रेम प्रकाशला कॉल केला होता. प्रशासनाकडून गोळीबार करण्यात येणार असल्याची माहिती विकासने दिली.

त्यानंतर जेसीबी घेऊन घराजवळ येण्याचे राहुलला सांगण्यात आले होते. जेसीबी दरवाजासमोर लावून जात असताना विकास दुबेने थांबण्यास सांगितले. पोलिस येताच त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली, अशी माहिती राहुलने दिली आहे. बिकरु पोलिस गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आले तेव्हा जेसीबी ड्रायव्हरचे नाव मोनू असे नोंदवण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशीनंतर राहुलचे नाव समोर आले होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT