Manipur Violence sakal
देश

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; संतप्त ग्रामस्थांनी छावण्या पेटविल्या; तीन जणांना जिवंत जाळल्याचा प्रकार

शस्त्र जप्तीची मोहीम युद्ध पातळीवर सुरू

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना अजूनही घडत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी शांततेचे आवाहन करूनही अनेक भागात कुकी समुदायावरची नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.

काकचिंग जिल्ह्यातील नाराज ग्रामस्थांनी सुगनू येथे रिकाम्या असलेल्या असंख्य छावण्या पेटवून दिल्या. या छावण्यांत यूनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे (युकेएलएफ)दहशतवादी थांबले होते. दरम्यान, तीन जणांना जिवंत जाळल्याचा प्रकार घडला असून त्यास अद्याप दुजोरा मिळाला नाही. तसेच शस्त्र जप्तीची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे.

काकचिंग जिल्ह्यातील सेरौ येथील सुगूनचे काँग्रेस आमदार के. रणजित यांच्या निवासस्थानासह ग्रामस्थांनी किमान शंभर छावण्या पेटवून दिल्या. यावरुन ग्रामस्थांचा रोष लक्षात येतो. गेल्या दोन दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहे.

काल रात्री झोपड्यांना आग लावण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बटालियन आणि सीमा सुरक्षा दल तसेच राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील स्वयंसेवकासह नाजरेथ शिबिरात दहशतवाद्यांशी मुकाबला केला.

बराच काळ गोळीबार झाल्यानंतर तेथून दहशतवादी पळून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी या छावण्या पेटवून दिल्या. या छावणीत कुकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. दुसरीकडे पश्‍चिम इम्फाळ जिल्ह्यातील के फायेंग येथेही सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांत प्रचंड गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी कुकी दहशतवाद्यांनी चीरघर येथे घराला आग लावली. अन्य एका घटनेत लांगोल येथे देखील घरांना आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. मणिपूरमध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान ९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर ३१० जण जखमी झाले. मणिपूरच्या हिंसाचारामुळे निर्वासित झालेल्या नागरिकांसाठी सरकारने मदत छावण्या उभारल्या आल्या आहेत. सध्या २७२ छावण्या असून त्यात ३७,४५० नागरिक राहत आहेत.

विविध ठिकाणांहून ७९० शस्त्रे जप्त

मणिपूरच्या सुरक्षा दलाकडून ठिकाठिकाणी कारवाई केली जात आहे. यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लूटमार केलेले ७९० अत्याधुनिक आणि स्वयंचलित शस्त्रांत्रासह १०६४८ स्फोटके जप्त करण्यात आले. राज्यात तीन मे रोजी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर दहशतवाद्यांनी पोलिस आणि अन्य सुरक्षा दलाकडून शस्त्रे पळविली होती.

शांतता प्रस्थापित होण्यासाठी पोलिसांकडून शस्त्र जप्तीची व्यापक मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम ड्रोन आणि क्वाड काप्टरच्या देखरेखीखाली राबविली जात आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत करण्यात आले आहेत. लुटलेले शस्त्रे परत जमा करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या राज्यात आसाम रायफल्स आणि लष्कराचे सुमारे दहा हजार जवान तैनात आहेत.

जिवंत जाळले की मॉब लिचिंग?

मणिपूरमध्ये गेल्या चोवीस तासात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र त्यास अद्याप दुजोरा मिळू शकला नाही. इम्फाळमध्ये एका जमावाने तीन लोकांना जीवत जाळल्याचे म्हटले आहे. अन्य सूत्रानुसार त्यांना बेदम मारहाण करत ठार केल्याचेही म्हटले जात आहे. दोन वाहनांतून पीडित नागरिक लामसांग येथे जात असताना जमावाने हिंसाचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT