viral video 
देश

Video Viral : 'जुगाड वाले बाबा'; अनोख्या हेल्मेटची सोशल मीडियावर चर्चा

व्हिडिओ क्लिप उत्तर प्रदेशातील येथील असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल समाज माध्यमांवर अनेक गोष्टीं काही क्षणांत व्हायरल होत असतात. असेच एक बाबा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचा एक अनोखा आणि मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. ही व्हिडिओ क्लिप उत्तर प्रदेशातील येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भगवा पोषाख परिधान केलेले या व्यक्तीने डोक्याला एक हेल्मेट घातले आहे. हे हेल्मेट एखादा 'देसी जुगाड' वापरुन तयार केले आहे असे दिसत आहे.

या हेल्मेटमध्ये सोलर प्लेटसह पंखा बसवण्यात आला आहे. जो कोणी हे हेल्मेट घालून उन्हात जाईल, तो आपला चेहरा उन्हापासून वाचवू शकणार आहे. यासंदर्भात त्या बाबांना विचारले असता ते म्हणाले की, चेहरा हे संपूर्ण जगाचे इंधन आहे, ते नसेल तर काही नाही. आणि हा व्हिडिओ तेथे संपत आहे.

दरम्यान, हे बाबा रस्त्याने जात असताना त्यांना एका व्यक्तीने पाहून थांबवले. बाबांनी डोक्याला घातलेले अनोखे हेल्मेट पाहून त्याने उत्सुकतेने त्यांना हे काय आणि कसे तयार केले आहात याची विचारणा केली. यावेळी उन्हापासून वाचण्यासाठी हा जुगाड केल्याचे त्यांनी सांगितले.

खास म्हणजे या हेल्मेटच्या पुढील भागात पंखा बसवण्यात आला आहे. तर मागील बाजूस एक लहान सोलर प्लेट आहे, जी ऊर्जा निर्माण करत हा पंखा चालवते. बाबा सांगतात की सावलीला गेल्यावर पंखा बंद होतो. सूर्य जितका मजबूत असेल तितक्याच वेगाने हा पंखा धावतो. तर सावलीत जाताच पख्याची फिरण्याची गती कमी होते किंवा थांबते. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाल असून तुम्हाही WhatsApp किंवा फेसबुकवर पाहिला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT