Social media viral video  
देश

Viral Video: म्हाताऱ्याची बॅटींग पाहून पोरांनी लावला डोक्याला हात!

भारतामध्ये क्रिकेट (Cricket) या खेळाला मोठा दर्जा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral video: भारतामध्ये क्रिकेट (Cricket) या खेळाला मोठा दर्जा आहे. त्याच्याविषयी देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये कमालीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले आहे. लहानांपासून मोठ्यांनाही या खेळाचं वेड आहे. गल्लीबोळात ते मोठमोठ्या मैदानावर क्रिकेटचे धडे (Love About Cricket) घेणाऱ्यांच्या क्रिकेटप्रेमाच्या गोष्टी फार चवीनं चर्चिल्या जातात. सोशल मीडियामुळे (Social Media Video Viral) तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होवून क्रिकेटप्रेमींच्या त्या आनंदाला आणखी व्दिगुणीत करत असल्याचे दिसून आले आहे. असाच एक व्हिडिओ आणि त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. (Viral Video of Old man playing cricket boys shocked batting reaction)

सध्या सोशल मीडीयावर एक व्हिडिओ व्हायरल(viral Video) झाला आहे. त्यामध्ये एका आजोबांनी आपल्या क्रिकेटची वेगळी ओळख मुलांना करुन दिली आहे. आजोबांची बॅटिंग पाहून तर पोरांनी डोक्यालाच हात लावला आहे. त्यांचा जोश आणि अनोखी स्टाईल ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्या व्हिड़िओवर आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांकडून आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी आजोबांच्या क्रिकेट खेळण्याच्या त्या अनोख्या स्टाईलला सलाम केला आहे.

मीमवाले न्युज नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ इंस्टावर शेयर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, बुस्टर डोस घेतलेल्या आजोबांची कमाल. एका बागेमध्ये काही मुलं क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्यात ते आजोबाही सहभागी झाले आहेत. यावेळी त्या आजोबांनी आपल्या क्रिकेटचा परिचय मुलांना करुन दिला आहे. त्यांनी एक टोला लगावल्यावर ज्या उत्साहात धावा काढल्या आहेत ते पाहून मुलांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT