viral video of pre wedding photoshoot groom stood upside down and dancing bride esakal
देश

लग्न आहे की नवरा-नवरीच सर्कस! प्री वेडिंगचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

लग्नसराईतील एकापेक्षा एक व्हिडिओ आपल्या समोर येतात. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यांच्यावर आपल्याला हसायला येतं. आता हे लोक मुद्दाम अशा गोष्टी करतात की कळत नाही, की नकळतपणे असं चालतं, पण त्यांना पाहून खूप मजा येते. असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, एका कपल्सचा प्री-वेडिंग फोटोशूट व्हिडिओचा. तो व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

हल्ली वेडिंग फोटोशूटशिवाय प्री-वेडिंग फोटोशूटचाही (Pre wedding Photoshoot) खूप ट्रेंड पाहायला मिळतोय. यावेळी समोर आलेल्या प्री वेडिंग शूटच्या व्हिडीओला सर्कस म्हणणं चुकीचं ठरणार नाही. इथे नवरदेवाची अवस्था जरा वेगळीच दिसतेय, त्यामुळे शूट करणाऱ्या फोटोग्राफरलाही खूप मेहनत घ्यावी लागत आहे. आता फोटो कसेही आले तरी लोक व्हिडिओ पाहून आनंद घेत आहेत

व्हायरल होणारा व्हिडिओ एखाद्या मंदिरासमोरचा दिसत आहे. इथे हे कपल स्वत:चं प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी पोहोचले आहे. इतक्यात फोटोग्राफरने नवरदेवाला वेगळ्या अंदाजात पोज द्यायला सांगितलं, मग नवरदेव उलटा उभा राहिला, म्हणजे डोकं खाली करून पाय वर. नववधूसमोरची ही क्रिएटिव्हिटी पाहून फोटोग्राफरला काही तरी नवीन सापडलं असेल, पण हा व्हिडोओ पाहून लोकांना मात्र खूप मजा येत आहे. इतकंच नाही तर वधू वराच्या शेजारी उभी राहून नाचताना दिसत आहे. या व्हिडिओची आता खिल्ली उडवली जातेय. या व्हिडिओचं लोकेशन माहीत नाही, पण वधू-वरांच्या कपड्यांकडे पाहून हे साऊथ इंडियन कपलचं प्री वेडिंग फोटोशूट असल्यासारखं वाटतंय.

चेतना नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ Tall_Dreams हँडलवरून शेअर केला आहे. शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत शेकडो लोकांनी लाईक केलं असून जवळपास नऊ हजारच्या वर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक युझर्स व्हिडिओवर आपले मजेशीर फिडबॅक देत आहेत आणि या सर्कसची खिल्ली उडवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT