Devotees gather at the Banke Bihari Temple in Vrindavan as authorities open the 54-year-old mysterious treasure chamber revealing ancient divine relics and gold ornaments.
esakal
secret treasure of Lord Banke Bihari in Vrindavan has been opened: वृदांवनाचे ठाकुरजी म्हणजेच भगवान बांके बिहारी यांच्या मंदिराचा खजाना अखेर तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक कालावधीनंतर शनिवारी उघडला गेला आहे. असे सांगितले जात आहे की, हा खजाना जवळपास १६० वर्षे जुना आहे आणि हा आता ५४ वर्षानंतर पुन्हा एकदा उघडला जात आहे.
खजाना उघडण्याची प्रक्रिया गर्भगृहाच्या प्रमुख द्वारापासून सुरू करण्यात आली, जिथे सर्वात आधी दीप प्रज्वलित करण्यात आले आणि लिंबाची फांदी ठेवली गेली. यानंतर विधिवत मंत्रोच्चारानंतरच दरवाजा उघडला गेला. खजाना उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीतच केली जात आहे. तर यावेळी मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला गेला आहे.
खजाना उघडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रिकरण केले जात आहे, जेणेकरून संपूर्ण कार्यवाहीचे दस्तावेजीकरण करता येईल. असे सांगितले जात आहे की, या खजान्यात भगवान बांके बिहारींची बहुमूल्य आभूषणं, सोने-चांदीसह मौल्यवान धातू आण प्राचीन दुर्मिळ वस्तूंचा समावेश आहे.
तर सूत्रांच्या माहितीनुसार हा खजाना मंदिराच्य प्राचीन परंपरेशी निगडीत आहे. असे म्हटले जाते की, हा खजाना उघडणे वर्ज मानले जात होते. मंदिराचे अनेक पुजारी आणि सेवेकरी ही परंपरा कायम राखण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, खजाना मर्यादेचे प्रतिक आहे आणि तो उघडणे उचित नाही.
एवढंच नाहीतर मंदिरातील एका पुजाऱ्याने असंही सांगितलं आहे की, हा खजाना शतकानुशतकांपासून देवाच्या संपत्तीच्या रूपात सुरक्षित आहे आणि पुजाऱ्याने हा देखील दावा केला आहे की, या खजान्यात नाग दाढीवाला साप बसलेला आहे, जो वर्षानुवर्षे याचे संरक्षण करत आहे. त्यांचे मत आहे की, हा खजाना उघडल्यास हा नाग प्रकट होईल आणि आपली प्रतिक्रिया दाखवू शकतो.
खजाना प्रदीर्घ काळापासून बंद असल्याने यामध्ये विषारी वायू तयार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी प्रशासनाने सुरक्षेची विशेष व्यवस्था केली आहे. तज्ज्ञांच्या एका पथकास खजान्याची सफाई आणि निरीक्षणाची जबाबदारी दिली गेली आहे. तसेच खजन्याची यादी करण्याची प्रक्रिया देखील जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीत केली जात आहे. खजान्यात ज्या काही वस्तू आणि आभूषणं मिळतील त्याची मोजदाद आणि यादी केली जाईल. अशीही शक्यता वर्तवली जात आहे की, या खजान्यात अकल्पनीय प्रमाणात सोने-चांदी आणि रत्नजडीत आभूषणं मिळू शकतात. वृदांवनवासियांसाठी हा क्षण अतिशय ऐतिहासिक आणि श्रद्धापूर्ण असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.