Wardah Khan  
देश

Inspirational Story: तिने कॉर्पोरेट जॉबला लाथ मारली अन् 24 व्या वर्षी UPSC मध्ये मिळवली 18 वी रँक; वाचा प्रेरणादायी स्टोरी

UPSC exam 2023: मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी यश मिळवलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी यश मिळवलं आहे. यूपीएससी म्हणजे देशातील सर्वात कठीण असलेले परीक्षा. भल्याभल्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. (Wardah Khan quit corporate job to prepare for civil services)

अनेकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष या परीक्षेच्या अभ्यासात घालवतात, पण त्यांना यश मिळत नाही. पण, असेही काही असतात जे एक-दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनी आणि स्मार्टवर्कने हा अवघड गड सर असतात. अशीच स्टोरी आहे नॉयडामधील वर्धाह खान हिची.

देशातील अनेक तरुण असे असतील ज्यांना आपली नोकरी आवडत नसेल. अनेकांना आपला कॉर्पोरेट जॉब सोडावा वाटतो आणि काहीतरी व्यवसाय किंवा स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करावासा वाटतो. जवळपास सर्वांना कधीनाकधी असा विचार डोक्यात आला असणार आहे. पण, वर्धाह खान ही केवळ विचार करुन थांबली नाही. तिने निर्णय घेतला. कॉर्पोरेट जॉबला लाथ मारली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी सुरु केली. (secured 18th rank in UPSC exam 2023)

वर्धाह खान हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पहिल्या विसमध्ये स्थान मिळवले आहे. तिचा रँक १८ आला आहे. ती फक्त २४ वर्षांची आहे. वर्धाह खान हिला भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये Indian Foreign Service (IFS) काम करायची इच्छा आहे. जागतिक पातळीवर देशाला अभिमान वाटेल असं काही करण्याची तिची इच्छा आहे.

वर्धाह खान म्हणते की, 'प्रत्येक उमेदवाराप्रमाणे मी फक्त यादीमध्ये नाव येण्याची अपेक्षा ठेवत होते. पण, माझे पहिल्या २० जणांमध्ये नाव येणे अविश्वसनीय आहे. पहिल्या २० मध्ये स्थान मिळेल असं मला वाटलं नव्हतं. मला स्वप्नात जगत असल्यासारखं वाटत आहे. माझ्या घरातील सर्वांना याचा आनंद आणि अभिमान वाटत आहे.' वर्धाह खान हिने एएनआयला मुलाखत दिली आहे.

वडिलांचे नऊ वर्षांपूर्वी निधन

वर्धाह खान ही नोयडा सेक्टर ८२ मधील विवेक विहारची रहिवाशी आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून कॉमर्स केलंय. तिच्या वडिलांचे नऊ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. ती आपल्या आईसोबत राहते. खान सांगते की, तिला कॉलेजमध्ये असतानाच इतिहास, राजसंस्था अशा विषयांमध्ये रस होता. पण, नोकरी करत असताना तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय पक्का केला.

मी आठ महिन्यांपासून कॉर्पोरेटमध्ये काम करत होते. पण, त्याचे मला समाधान मिळत नव्हते. मला देशासाठी काम करायचं होतं. माझा कल आणि यूपीएससी अभ्यासक्रमाची सांगड घालत मी संधी पाहिली आणि आठ महिन्यांमध्येच कॉर्पोरेट जॉब सोडला. मी संपूर्ण एक वर्ष ऑनलाईन क्लासेस केले. बेसिक अभ्यासावर मी लक्ष दिलं अन् दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले असं वर्धाह खान म्हणाली. (UPSC News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT