PM Modi Esakal
देश

PM Modi: PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल, अडचणी वाढणार?

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी बांसवाडा येथे केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशात निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे, अशातच सभा, प्रचार दौरे, प्रचार सभा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. अशातच एका प्रचार सभेच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी बांसवाडा येथे केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

'देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे', माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या वक्तव्याचा दाखला मोदींनी सभेत दिला होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि माकपने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

काँग्रेस आणि माकपने मोदींच्या वक्तव्यावर कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. आयोगाने आता या दोन्ही तक्रारींची दखल घेतली आहे. मोदींच्या भाषणाची चौकशी सुरू झाली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असं मोदी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT