modi and mamata 
देश

Video: 'याचं उद्घाटन मी आधीच केलंय'; ममतांनी मोदींना थेट सुनावलं

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारला धारेवर धरण्याबाबत पटाईत आहेत. आजवर अनेकदा त्यांनी मोदी सरकारला खुलेआम आव्हान दिलंय. आज पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात असंच एक द्वंद्व पहायला मिळालं आहे. हे दोघेही पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या कॅम्पसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते समोरासमोर आले होते. मात्र, याच उद्घाटनावरुन आता दोघांमध्ये जुंपलेली पहायला मिळाली आहे.

पंतप्रधानांनी आज ज्या संस्थेचे उद्घाटन केले त्याचे उद्घाटन आपण यापूर्वीच केल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. याबरोबरच त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले. कार्यक्रमात ममताही सहभागी झाल्या होत्या.

त्या म्हणाल्या की, या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दोनदा मला फोन केला. कोलकत्यातच कार्यक्रम आहे व ही संस्थाही केंद्र-राज्य सहकार्यातून सुरू आहे याचा विचार करून मी कार्यक्रमात सहभागी झाले. मात्र एकाच संस्थेचे दुसऱ्यांदा उद्घाटन करणे योग्य नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्हाला रुग्णालयांची गरज होती त्यामुळे मी त्यावेळीच चित्तरंजन रूग्णालयाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन केले व त्याचे रूपांतर कोवीड वॉर्डात करण्यात आले होते. यासाठी बंगाल सरकारने ११ एकर जमीन व २५ टक्के खर्चाचा भार उचलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT