wedding in the temple and 500 stray dogs came at reception 
देश

नवदाम्पत्याने रिसेप्शनसाठी आमंत्रित केले 500 श्वानांना!

वृत्तसंस्था

भुवनेश्वर (ओडिशा): विवाहानंतर स्वागत समारंभाचे (रिसेप्शन) आयोजन केले जाते. रिसेप्शनला नातेवाईकांसह मित्र-मंडळींना आमंत्रित केले जाते. पण, एका नवदांपत्याने चक्क शहरातील 500 श्वानांना आमंत्रित करून, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. संबंधित विवाह चर्चेत आला आहे.

भुवनेश्वर येथे यूरेका आप्टा आणि जोआना वांग यांचा 25 सप्टेंबर रोजी विवाह पार पडला होता. यूरेका आप्टा या वैमानिक आणि चित्रपट निर्मात्या आहेत. जोआना वांग दंत चिकित्सक आहे. विवाहानंतर त्यांनी शहरातील 500 हून अधिक भटक्या श्वानांना जेवण देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी स्थानिक पशू बचाव संघटनेसोबत करार केला. पशू कल्याण ट्रस्ट एकमराच्या स्वयंसेवकांनी रिसेप्शनसाठी 500 हून अधिक श्वानांना आणले होते. त्यांच्यासाठी विशेष भोजनाची व्यवस्था केली होती.

आप्टाने सांगितले, 'जोआना वांग आणि माझ्यात तीन वर्षांचे नातेसंबंध होते. यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले व श्वानांसाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार केला. यामागे एक कारण होते. ते म्हणजे, लॉकडाऊनमध्ये एका भटक्या श्वानाला अपघात झाला होता. माझ्या एक मित्र व जोआनाने त्या श्वानावर उपचार करून घेतले. त्यानंतर आम्ही त्याला एनिमल वेलफेयर ट्रस्ट एकमरा या डॉल शेल्टरमध्ये घेऊन गेलो. डॉग शेल्टर होममध्ये गेल्यानंतर खूप चांगले वाटले. तेथे अनेक श्वान आनंदात खेळत होते, तेथे त्यांची काळजी घेतली जात होती. यानंतर आम्ही शेल्टर होमसाठी भोजन आणि औषधे खरेदी केली शिवाय शहरात एक व्यापक अभियान सुरू केले. भटक्या श्वानांना मदत मिळू शकेल. विवाहानंतर आम्ही त्यांना रिसेप्शनसाठी आमंत्रित केले होते. त्यांना भोजन देताना आनंद वाटला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT