mamata_banerjee 
देश

मुस्लिमांना केलेलं आवाहन ममतांना भोवणार; ECने 48  तासांत मागितलं उत्तर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने आचार संहितेच्या उल्लंघनाप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना नोटिस जारी केली आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना पुढील ४८ तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या नेतृत्त्वातील भाजप प्रतिनिधिमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेत ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार केली होती. भाजपने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, ममतांनी मुस्लिम मतदारांना एकजूट होत आपलं मत टीएमसीला देण्याचे आवाहन केले होते.  निवडणूक आयोगाने नोटिस जारी करत म्हटलंय की, ममतांनी आदर्श आचार संहितेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. ममतांनी हे वक्तव्य हुंगली जिल्ह्यातील तारकेश्वरमध्ये केले होते. त्यामुळे ममता बॅनर्जी निवडणूक आयोगाच्या नोटिसाला काय उत्तर देतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

निवडणूक आयोगाची भेट घेत मुख्तार अब्बास नकवी यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम मतदारांना एकजूट होत तृणमूलला मत देण्यास सांगितलं आहे. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली असून कारवाईची मागणी केली आहे. 

पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी मुस्लिमांना एकजूट होऊन मतदान करण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनामुळे स्पष्टं होतंय की तृणमूल काँग्रेस निवडणूक हरली आहे, असं मोदी म्हणाले. एका रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्याप्रमाणे ममता बॅनर्जींनी मुस्लिमांना एकजूट होऊन मतदान करण्यास सांगितलं, त्याप्रमाणे हिंदूंनी एकजूट होऊन मतदान करण्याचं आवाहन भाजपनं केलं असतं तर निवडणूक आयोगाकडून सात-आठ नोटिसा मिळाल्या असत्या.  तसेच देशातील अनेक वृत्तपत्रात याबाबत संपादकीय छापले गेले असते. 

ममता बॅनर्जींनी नेमकं काय म्हटलं होतं?

निवडणूक आयोगाच्या नोटिसीनुसार ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, मी माझ्या अल्पसंख्याक भाऊ-बघिनींना हाथ जोडून विनंती करते की, अल्पसंख्याक मतांना विभाजित करु नका. अल्पसंख्याक मतं विभागण्यासाठी सीपीएम आणि बीआयपीचे लोक भाजपकडून पैसे घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT