Rakesh_Tikait 
देश

आता संसदेबाहेर भरणार मंडई; राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

वृत्तसंस्था

West Bengal Assembly election 2021: कोलकाता : नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. कोलकाता आणि नंदीग्राम येथे संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केलं आहे. 

शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांनीही या महापंचायतीत सहभाग नोंदवला. यावेळी टिकैत म्हणाले, 'संयुक्त किसान मोर्चातर्फे ज्या दिवशी निर्णय घेतला जाईल, त्या दिवशी संसदेसमोर एक बाजार भरवला जाईल. पंतप्रधानांनी कोठेही भाजीपाला विका, असं सांगितलं आहे. त्यामुळे संसदेच्या ठिकाणी जाऊन धान्य विकण्याचं पुढील लक्ष्य आहे. आमच्याकडे साडेतीन लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख शेतकरी आहेत, त्यामुळे आता हे सर्वजण दिल्लीत जाणार आहेत.'

नंदीग्राम येथील सभेत बोलताना टिकैत म्हणाले, भाजप सरकारने देशाची लूट केली आहे. त्यामुळे भाजपला मतदान करू नका. आपला बंगाल वाचवा. जर कुणी मत मागायला आलं तर त्यांनी आम्हाला MSP कधी मिळेल असा प्रश्न विचारा, तांदळाची किंमत १८५० रुपये झाली आहे, त्यामुळे मग एमएसपी कधी मिळेल?

भाजपाला मत देऊ नका
टिकैत म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार शेतकरी आणि त्यांच्या आंदोलनाचा कणा मोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे जन-विरोधी सरकार आहे. त्यामुळे त्यांना मत देऊ नका. जर त्यांना मत दिलं तर तुमच्या जमिनी मोठ्या कॉर्पोरेट्स आणि उद्योगांच्या हातात जातील. आणि तुम्ही अडचणीत याल. 

भाजप हा धोका देणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही भाजपविरोधात आणि गरीब शेतकऱ्यांसोबत उभे राहण्यांच्या पाठीशी उभे राहू. बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेली किसान महापंचायत म्हणजे कोणत्या एका पक्षाला पाठिंबा देण्यासाठी बोलावण्यात आली नाही. आम्ही कोणत्याही एक विशिष्ट पक्षासाठी मते मागण्यासाठी आलो नाही, हे लक्षात घ्या. आम्ही फक्त बंगालमधील शेतकऱ्यांना भाजपविरोधात लढा सुरू करण्याचे आवाहन करण्यासाठी आवाहन करत आहोत, असं टिकैत यांनी स्पष्ट केलं.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

SCROLL FOR NEXT