mamta-banerjee 
देश

मतदानापासून रोखण्यासाठी भाडोत्री गुंडांचा वापर 

पीटीआय

कोलकता - ‘बंगालमध्ये मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी भाजपने भाडोत्री गुंड आणले आहेत, असा आरोप करीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला. पळी, उलथणे व स्वयंपाकाच्या इतर साधनांसह या गुंडांचा धैर्याने सामना करा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले. 

नारायणगड आणि पिंगला येथील जाहीर सभेत बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे कुटुंब विश्‍वासघातकी असल्याचा उल्लेख करीत या घरातील एक व्यक्ती पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काल रात्री लोकांना पैसे वाटप करीत असल्याचे दिसून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या भागातील महिलांनी त्याला पकडले आणि अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. भाडोत्री ३० गुंडांना महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, असा दावा केला. सुवेंदू अधिकारी यांच्‍यावर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांना मंत्रिमंडळात सर्वोच्च स्थान देण्यास मी जबाबदार आहे. पण त्यांनी टीएमसीला धोका देत भाजपशी संधान साधले. त्यांना पैशाचे आमिष दाखविण्‍यात आले. पहिल्या टप्प्यानंतरच भाजपचे भवितव्य ठरणार आहे, असा भाकीतही त्यांनी केला. राज्यात निवडणूक  मुक्त व निष्पक्ष पद्धतीने घ्याव्यात, अशी विनंती बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

ममतांचा आरोप
मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी मथुआ समाजाच्या मंदिराला भेट देऊन लोकांशी चर्चाही केली. यावर निशाना साधत हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची टीका बॅनर्जी यांनी आज केली. त्या म्हणाल्या की, येथे मतदान सुरू आहे ते (पंतप्रधान) बांगलादेशात भाषण देत आहेत. ही बाब आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

SCROLL FOR NEXT