jp nadda bjp 
देश

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपची 'पावरी', जेपी नड्डांचा व्हीडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात 8 टप्प्यात मतदान होणार आहे. सुरक्षेचं कारण देत निवडणूक आयोगानं 8 टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे असं म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीय. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर ममता बॅनर्जींनी शहा, मोदींच्या शेड्युलनुसार घोषणा केली आहे का असं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारानिमित्त दौऱ्यावर असताना जे पी नड्डा यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

जेपी नड्डा या व्हायरल व्हीडिओमध्ये पावरी हो रही है अंदाजात रॅलीला संबोधित करताना दिसत आहे. एका रॅलीमध्ये भाषण करताना जे पी नड्डा म्हणतात की, ही बंगालची जनता आहे. हे आम्ही आहोत आणि बंगालमध्ये परीवर्तनाची तयारी सुरु आहे. सध्या जेपी नड्डा यांची ही क्लीप ट्रेंडमध्ये असून पावरी व्हीडिओच्या पार्श्वभूमीवर त्याच अंदाजात नड्डांचे भाषण शेअर केले जात आहे. भाजप प्रवक्ते तजिंदर पाल सिंह बग्गा यांनीही असा एक व्हीडिओ शेअर केला आहे. 

बग्गा यांचे ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या पोस्टला उत्तर असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये तृणमूलने भाजपच्या एका सभेतील रिकाम्या खुर्च्या आणि त्यावर एकच व्यक्ती बसलेली दिसत होती. हा फोटो शेअर करत टीएमसीने म्हटलं होतं की, हे बंगाल भाजप आहे, ही त्यांची सभा आहे आणि इथं त्यांची पावरी होत आहे. 

टीएमसीने केलेल्या पोस्टची खूप चर्चा झाली. टीएमसीने शेअर केलेले फोटो सभेवेळचे नव्हते तर सभा सुरु होण्याच्या आधीचे होते. जेपी नड्डा यांच्या भाषणाला पावरी व्हीडिओला जोडताना एक प्रकारे भाजपने टीएमसीला प्रत्युत्तर दिलं आहे. 

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय आरोप् प्रत्यारोप होत आहेत. निवडणुक आयोगाने शुक्रवारी बंगालसह पाच राज्यात विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान पार पडणार असून 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT