BJP 
देश

West Bengal: भाजपात आयारामांना दिलेल्या संधीने जुने नाराज; तोडफोड करुन नाराजी व्यक्त

सकाळवृत्तसेवा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमधील जुने कार्यकर्ते-नेते आणि पक्षात आताच अलिकडे दाखल झालेले नेते यांच्यामधील झगडा समोर आला आहे. भाजपने केलेल्या तिकीट वाटपावरुन रविवारी पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन आणि तोडफोड झाल्याचे पहायला मिळाले. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याअंतर्गत 75 जागांवर होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 63 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यात येत्या 27 मार्चपासून मतदानास प्रारंभ होत असून आठ टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

उमेदवारांची यादी जाहीर करत भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी म्हटलं की बाबुल सुप्रियो टॉलीगंजमधून विधानसभा निवडणूक लढवतील. तर बंगाली अभिनेत्री आणि हुगलीच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना पक्षाने त्यांच्याच खासदारकीच्या क्षेत्रातील चुंचुडा विधानसभा जागेवर उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच राज्यातील अनेक भागांमध्ये विरोध प्रदर्शनास सुरवात झाली. सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी यांना अलीपुरद्वार जागेवरुन उमेदवार बनवल्याने तसेच गोरखा जनमुक्ती मोर्चा सोडून भाजपात आलेले विशाल लामा यांना कालचिनीमधून उमेदवारी दिल्याने उत्तर बंगालमध्ये विरोधास प्रारंभ झाला आणि भाजपचे स्थानिक नेते रस्त्यावर उतरले. 

हुगली जिल्ह्यामध्ये तृणमूलमधून भाजपमध्ये सामील झालेले रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना उमेदवार बनवल्याने नाराज झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयातच तोडफोड केली आहे. अनेक जिल्हास्तरिय नेत्यांनी देखील तिकीट न मिळाल्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. या दरम्यान तृणमूल काँग्रेस सोडून अलिकडेच भाजपात सामील झालेले सोवन चट्टोपाध्याय आणि त्यांच्यासोबत बैसाखी बंदोपाध्याय यांनी तिकीट न मिळाल्याने भाजपाला रामराम ठोकला आहे. चट्टोपाध्याय अनेक दशकांपासून बेहाला पूर्व जागेचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. मात्र इथून आता पायल सरकार यांना तिकीट देण्यात आले आहे, ज्या अलिकडेच पक्षात सामील झाल्या आहेत. चट्टोपाध्याय यांनी राज्याचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी अपमान केल्याचा आरोप केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT